Shubhman Gill | ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेतून मला खूप काही शिकायला मिळालं : शुबमन गिल
टीम इंडियाच्या या युवा खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरोधातील 3 कसोटींमध्ये 259 धावा केल्या.
मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या (India Tour Australia 2020-21) मागे दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. या दुखापतीमुळे अनेक खेळाडूंना कसोटी मालिकेला मुकावे लागले. पण ही दुखापत युवा खेळाडूंच्या पथ्यावर पडली. अनुभवी खेळाडू जायबंदी झाल्याने नव्या दमाच्या खेळाडूंना कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या नव्या दमाच्या खेळाडूंनी या संधीचं सोनं करत दमदार कामगिरी केली. युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलनेही (Shubhman Gill) चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळीसह निर्णायक भू्मिका बजावली. त्याने भारताच्या विजयात योगदान केलं. शुबमनने त्याच्या यशाचं सारं क्रेडीट सिक्सर किंग युवराज सिंहला (Yuvraj Singh)दिलं आहे. (aus vs ind team india opner shubaman gill give all credits yuvraj singh for performence against australia)
गिल काय म्हणाला?
“आयपीएलच्या 13 व्या मोसमाआधी (IPL 2020) युवराज सिंहने 21 दिवसीय क्रिकेट कॅंपचं आयोजन केलं होतं. या कँपमध्ये मी सहभागी झालो होतो. या कँम्पमध्ये शॉर्ट बोल कसा खेळायचा, तसेच वैविध्यपूर्ण चेंडूंचा सामना कसा करायचा हा सराव युवराजने माझ्याकडून करुन घेतला. मला या सरावाचा फायदा ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत झाला”, असं गिल म्हणाला. गिलने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. यावेळेस तो बोलत होता.
नर्व्हस नाईंटी बद्दल काय म्हटलं?
शुबमन ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या सामन्यातील दुसऱ्या डावात नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. म्हणजेच त्याचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. गिलने 91 धावांची निर्णायक खेळी केली. या खेळीबाबत गिलने प्रतिक्रिया दिली. “शतक पूर्ण केलं असतं तर आणखी आनंद झाला असता. टीम इंडियाच्या विजयात मी योगदान देऊ शकलो, याबाबत मी आनंदी आहे. या मालिकेतून मला खूप काही शिकायला मिळालं”, असंही गिलने स्पष्ट केलं.
कसोटी मालिकेतील कामगिरी
शुबमन गिलला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतून पदार्पणाची संधी मिळाली. गिलने या मालिकेतील एकूण 3 सामन्यांमधील 6 डावात 2 अर्धशतकांसह 51.80 च्या सरासरीने दमदार 259 धावा केल्या.
भविष्याबाबत काय म्हणाला?
“भविष्यात अशाच प्रकारे टीम इंडियासाठी सातत्याने चांगली कामगिरी करण्याची माझे ध्येय आहे. माझ्या कामगिरीवर अनेकांचे लक्ष असणार आहे, यामुळे इंग्लंडविरोधातील मालिका माझ्यासाठी महत्वाची असणार आहे”, असंही गिलने नमूद केलं. गिलची इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंडविरोधात गिल कशी कामगिरी करणार याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण
(aus vs ind team india opner shubaman gill give all credits yuvraj singh for performence against australia)