AUS vs IND : विराटने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी उचललं मोठं पाऊल, टीम इंडियासोबत न जाता असं केलं
India vs Australia Test Series : विराट कोहलीची बॅट गेली अनेक दिवस शांत आहे. मात्र आता विराट इरेला पेटला आहे. विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियापासून दूर होत मोठा निर्णय घेतला आणि तयारीला लागलाय.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने घेतलेल्या एका निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विराट ऑस्ट्रेलियात पोहचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहली रविवारी 10 नोव्हेंबरला संध्याकाळी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदा 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना पर्थ येथे होणार आहे.
टीम इंडियाचे खेळाडू 2 तुकडीत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारताची पहिली तुकडी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली आहे. मात्र त्याआधीच विराट तिथे पोहचला आहे. विराट शनिवारी मुंबई विमानतळावर दिसला होता. विराट त्याची पत्नी अनुष्का आणि दोन्ही मुलं हे एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. याचाच अर्थ विराट शनिवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता.
न्यूझीलंडविरुद्ध अपयशी
न्यूझीलंडने भारताला मायदेशात व्हाईटवॉशने पराभूत केलं. न्यूझीलंडने ती मालिका 3-0 ने जिंकली. विराटला अनुभवी फलंदाज या नात्याने काही खास करता आलं नाही. विराटला धावांसाठी त्या मालिकेत संघर्ष करावा लागला. विराटला यांची खंत आहे. त्यामुळे आता विराट कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे आता विराट पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव करुन मैदानात कांगारुंना दणका देत टीकाकारांना चोख उत्तर देतो का? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान विराटची बॅट ऑस्ट्रेलियाच चांगलीच चालते. विराटने ऑस्ट्रेलियात 8 शतकं ठोकली आहेत. विराटने ऑस्ट्रेलियात 25 सामन्यांमध्ये 47.48 च्या सरासरीने 2 हजार 42 धावा केल्या आहेत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड