Ajinkya Rahane | लेक खांद्यावर, बायको बाजूला, घरी परतताच अजिंक्य म्हणाला….

टीम इंडियाने अजिंक्यच्या नेतृत्वात कांगारुंवर ऐतिहासिक मालिक विजय मिळवला. यानंतर भारतात परतल्यानंतर रहाणेचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

Ajinkya Rahane | लेक खांद्यावर, बायको बाजूला, घरी परतताच अजिंक्य म्हणाला....
अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 11:42 AM

मुंबई : कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला मालिका विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच भूमित 2-1 च्या अंतराने मालिका विजय (Border Gavaskar Trophy) मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया भारतात परतली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंचं विशेष म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणेचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. विमानतळावरुन कर्णधार रहाणे आपल्या राहत्या घरी पोहचला. या ठिकाणी रहाणेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. रांगोळी काढत आणि ढोल वाजवत रहाणेचं मुंबईतील राहत्या सोसायटीतील लोकांनी जोरदार स्वागत केलं. यावेळेस क्रिकेट प्रेमींनीही रहाणेच्या सोसायटीबाहेर एकच गर्दी केली होती. यानंतर रहाणेच्या हाताने केक कापून सेलिब्रेशन केलं. यानंतर अंजिक्यने विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. (aus vs ind test series first reaction of captain ajinkya rahane who returned home after a historic win against australia)

अजिंक्यची पहिली प्रतिक्रिया

“असं जोरदार स्वागत होईल, असं मला अपेक्षित नव्हतं. आमचं जोरदार स्वागत केलं, यामुळे मी भारावून गेलो आहे. मला फार बरं वाटलं. भारतात परतताना चांगले कपडे घालून ये, असा सल्ला मला राधिकाने (अजिंक्यची पत्नी) दिला, असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“हे मी जे काही सर्व पाहिलं, ते पाहून मी फार सरप्राईज झालो. माझं जोरदार स्वागत करण्यात आलं, हे पाहून मी फार आनंदी झालो. आपण जिंकलो, यात सर्वांच भारतीयाचं श्रेय आहे”, असं रहाणे म्हणाला.

सोसायटीचे आभार मानले

“सोसायटीतील आपण सर्व वॉकसाठी खाली यायचो. मी बऱ्याच वेळेले रनिंग करायचो. तुमचा मला नेहमीच सपोर्ट राहिला. ही सोसायटी माझी फॅमिली आहे, याचा मला फार आनंद होतोय”, असं म्हणत रहाणेने सोसायटीतील सर्वांचे आभार मानले.

रहाणेच्या सोसायटीतील शेजाऱ्यांची प्रतिक्रिया

“टीम इंडियाचा कसोटी मालिकेत 4-0 ने पराभव होईल, अशी भविष्यवाणी अनेक दिग्गजांनी केली होती. यानंतर टीम इंडियाने कांगारुंचा त्यांच्याच भूमित 2-1 ने पराभव केला. या ऐतिहासिक विजयाची नोंद सुवर्ण अक्षरात केली जाईल. अजिंक्य माझा सख्खा शेजारी आहे. तो टीम इंडियाचा कर्णधार असूनही तो फार डाउन टु अर्थ आहे”, अशी प्रतिक्रिया रहाणेच्या शेजाऱ्यांनी दिली.

अजिंक्यच्या गावातही जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या गावात जल्लोष साजरा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

संबंधित बातम्या :

Ajinkya Rahane VIDEO | ऑस्ट्रेलिया गाजवून टीम इंडिया मायदेशी, अजिंक्य रहाणेचं केक कापून स्वागत

टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, कारण अजिंक्य रहाणेच्या मागे ‘पवार ब्रँड’!

(aus vs ind test series first reaction of captain ajinkya rahane who returned home after a historic win against australia)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.