शब्द म्हणजे शब्द| Ajinkya Rahane याने शब्द पाळला!

WTC Final 2023 | अजिंक्य रहाणे याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महामुकाबल्यातून कमबॅक केलं. तसेच टीम इंडियाला गरज असताना मोठी खेळी केली.

शब्द म्हणजे शब्द| Ajinkya Rahane याने शब्द पाळला!
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 11:32 PM

लंडन | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनल सामन्यातील तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे याने 89 धावांची झुंजार खेळी केली. रहाणेने या खेळीसह अर्धशतकच ठोकलं नाही, तर टीम इंडियाला सावरलं. रहाणेने शार्दुल ठाकुर याच्यासोबत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रहाणेने यासह कमाल कमबॅक केलं. रहाणेने आपल्या कमबॅक मॅचमधून आपली किंमत दाखवून दिली. रहाणे आऊट ऑफ फॉर्म असल्याने बीसीसीआयने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र रहाणेने आपल्या कामगिरीने बीसीसीआयला संधी देण्यासाठी भाग पाडलं.

या महामुकाबल्यातील पहिल्या डावात टीम इंडियाचे अनुभवी आणि युवा फलंदाज ढेर झाले. मात्र रहाणेने दमदार खेळी साकारली. रहाणेने या खेळीसह ऑस्ट्रेलियाला काही वेळ अडचणीत आणत डोकेदुखी वाढवली. तसेच टीम इंडियाला सावरलं.

रहाणेची विक्रमी खेळी

अजिंक्य रहाणे याने कसोटीतील 26 वं अर्धशतक पूर्ण केलं. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय ठरला. अजिंक्य रहाणे याने कसोटी कारकीर्दमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रहाणे कसोटीमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा 13 वा भारतीय ठरला आहे. रहाणेने 89 कसोटी सामन्यांमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला.

हे सुद्धा वाचा

रहाणेने 17 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक केलं. रहाणेने या दरम्यानच्या काळात रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे स्पर्धेत आपली छाप सोडली. द्विशतक आणि शतकं ठोकली. त्यानंतर रहाणेने आयपीएल 16 व्या मोसमात दणकेदार कामगिरी केली. क्रिकेट चाहत्यांना रहाणेचे दुसरं रुप पाहायला मिळालं. रहाणेने 23 एप्रिलला सीएसकेकडून केकेआर विरुद्ध खेळताना अवघ्या 29 बॉलमध्ये 71 धावांची सनसनाट खेळी केली.

रहाणेला त्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. रहाणे तेव्हा म्हणाला होता की माझी सर्वोत्तम कामगिरी येणं अजूनही बाकी आहे. रहाणेने ही प्रतिक्रिया आयपीएलबाबत दिली होती. मात्र रहाणेची सर्वोत्तम कामगिरी ही फायनलमध्ये पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.