Video : नजर हटी दुर्घटना घटी…! न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा धाव घेताना संघ सदस्याने घेतला बळी
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेच्या दुसऱ्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. तसेच न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला संघातील खेळाडूच्या चुकीमुळे बळी द्यावा लागला.
मुंबई : ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पारडं कांगारुंच्या बाजूने झुकलेला आहे. पहिल्या डावात कॅमरोन ग्रीनच्या दीड शतकी खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला. एकटाच संपूर्ण न्यूझीलंड संघाला उरून पुरला. नाणेफेकीचा कौल जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने सुरुवातीला अपेक्षित कामगिरी केली. तसेच झटपट विकेट बाद केले. पण कॅमरोन ग्रीन एका बाजूने खिंड लढवत राहिला आणि पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 383 धावा केल्या. तर कॅमरोन ग्रीन 174 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. ग्लेन फिलिप्स आणि मॅट हेन्री वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. केन विल्यमसनकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण संघातील सदस्याच्या चुकीमुळे बळी द्यावा लागला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.
न्यूझीलंड संघाची धावसंख्या 12 असताना लॅथम स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मैदानात संघाची बाजू सावरण्यासाठी केन विल्यमसन उतरला होता. पहिला चेंडू खेळल्यानंतर दुसरा चेंडू मिड ऑफच्या दिशेने ढकलला आणि धाव घेण्यासाठी कॉल दिला. पण विल यंगने त्याच्याकडे पाहिलं नाही. खेळपट्टीच्या बरोबर मधोमध दोघांची टक्कर झाली. मार्नस लाबुशेनने महत्त्वाची विकेट ओळखून नॉन स्ट्रायकवर फेकला आणि केन विल्यमसनला बाहेरचा रस्ता दाखवला.
The pressure is on New Zealand after Kane Williamson was run out – the first time in a Test Match since 2012 @BLACKCAPS v Australia: 1st Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/S9itasfaDg
— TVNZ+ (@TVNZ) March 1, 2024
समालोचकांनाही या विकेटबाबत आश्चर्याचा धक्का बसला. समालोचक क्रेग मॅकमिलन म्हणाले की, “मी जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वास बसत नाही. न्यूझीलंडसाठी हे मोठं संकट आहे.” केन विल्यमसनच्या रनआऊटचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. फॉर्मात असलेल्या केन विल्यमसनचा असा बळी गेल्याने ऑस्ट्रेलियाचा निश्चितच फायदा झाला. त्यामुळे पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउदी (कर्णधार), स्कॉट कुगेलिजन, विल्यम राउर्के.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमरोन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड