World Cup 2023 Points Table : आता येणार खरी मजा, न्यूझीलंडच्या पराभवामुळे मोठा ट्विस्ट
ICC Cricket World Cup 2023 Points Table in Marathi : ऑस्ट्रेलिया आणि न्यझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये कांगारूंनी कमाल केली. सुरूवातीचे दोन सामने गमावून त्यानंतर त्यांनी जोरदार कमबॅक केलंय.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाचा 5 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये पहिला सामना खेळणारा ट्रॅव्हिस हेड याची शतकी खेळी त्यानंतर मॅक्सवेल आणि कमिन्स यांनी केलेल्या छोटेखानी वादळी खेळी केल्या होत्या. न्यूझीलंड संघ या आव्हानाचा पाठलाग करताना 50 ओव्हरमध्ये 383 धावांपर्यंत पोहोचू शकला. या पराभपवामुळे पॉईंट टेबलमध्ये मोठा काही बदल नाही पण सेमी फायनलसाठीची गणित बदलणार असल्याचं दिसत आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
आता वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ टॉपला आहे, तर दुसऱ्या स्थानी भारतीय संघ आहे. दोन्ही संघांचे गुण समान असून फक्त रन रेटच्या आधारावर आफ्रिका एक नंबरला आहे. भारताचा रविवारी इंग्लंड संघासोबत असणार आहे. आता पहिले चार संघ पाहिले तर पहिल्या दोन त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्याा संघाचे गुण सारखेच आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन संघाचे दहा गुण आहेत. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे आठ गुण झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये हे चार संघ जिंकले तर इतर संघ बाहेर झाल्यात जमा आहेत.
आजच्या सामन्याचा धावात आढावा
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा बॅटींग करताना सर्वबाद 388 धावा केल्य होत्या. यामध्ये ट्रॅव्हिस हेड याने शतकी खेळी केली. तर न्यूझीलंडकडून फिलिप्स आणि बोल्टने ३ विकेट घेतल्या. याने या आव्हानाचा पाठालाग करताना न्यूझीलंड संघाने चांगली सुरूवात केली होती. मात्र अवघ्या पाच धावांनी त्यांच्या हातातून सामना गेला.