AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली, पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी खाल्ली माती

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची दुसरा कसोटी सामनाही जिंकला आहे. यासह तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. यासह ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. तर पाकिस्तानला फटका बसला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचं ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली, पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी खाल्ली माती
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी जिंकत मालिका घातली खिशात, पाकिस्तानच्या फलंदाजांचं अपयश
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 3:01 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका 2-0 ने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला बऱ्यापैकी झुंज दिली. फलंदाजांनी कसब दाखवलं असतं तर सामना सहज जिंकता आला असता. पाकिस्तानने दुसरा कसोटी सामना 79 धावांनी गमावला. या सामन्यात पाकिस्तानने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं होतं. पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी अखेर माती खाल्ली असंच म्हणावं लागलं. शान मसूद, बाबर आझम आणि अघा सलमान वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. इतकंच काय तर तळाचे तीन फलंदाज शून्यावर तंबूत परतले. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पहिल्या डावात पाकिस्तानला 318 धावांवर रोखलं. त्या बदल्यात पाकिस्ताननं पहिल्या डावात सर्वबाद 264 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 262 धावा केल्या आणि विजयासाठी 316 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 237 धावा करू शकला.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 316 धावांचं आव्हान गाठण्यासाठी अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक जोडी मैदानात उतरली. ही जोडी काय खास करू शकली नाही. संघाच्या 50 धावा होण्यापूर्वीच दोघंही तंबूत परतले होते. त्यानंतर शान मसूद आणि बाबर आझम यांनी तिसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. शान मसूद 60 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर बाबर आझम 41 धावा करत बाद झाला. सऊद शकील 24, मोहम्मद रिझवान 35, अघा सलमान 50, आमेर जमाल 0, शाहीन अफ्रिदी 0, मिर हमजा 0 धावांवर तंबूत परतले.

दुसऱ्या डावात पॅट कमिन्सनने 5, मिचेल स्टार्कने 4 आणि जोश हेझलवूडने एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना औपचारिक असणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मिर हमजा

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड

Non Stop LIVE Update
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.