AUS vs PAK : पाकिस्तानचा ऐतिहासिक मालिका विजय, ऑस्ट्रेलियात त्यांच्याच घरात लोळवलं, कॅप्टन रिझवानच्या नेतृत्वात कारनामा
Australia vs Pakistan 3rd Odi : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास घडवला आहे. पाकिस्तानने कांगारुंचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत 22 वर्षांनी ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. पाकिस्तानने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 141 धावांचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानने या विजयी धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. पाकिस्तानने आव्हान 26.5 ओव्हरमध्ये 143 धावा केल्या. पाकिस्तानने यासह 2-1 ने मालिका जिंकली. पाकिस्तानने यासह मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात तब्बल 22 वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा केला. पाकिस्तानने याआधी 2002 साली ही 2-1 अशा फरकाने वनडे सीरिज जिंकली होती.
पाकिस्तानची बॅटिंग
पाकिस्तानच्या सॅम अय्युब आणि अब्दुल्लाह शफीक या सलामी जोडीने आश्वासक आणि संयमी सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर दोघे एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. लान्स मॉरिस याने या दोघांना माघारी पाठवलं. पाकिस्तानच्या 84 धावा असताना अब्दुल्लाह शफीक आऊट झाला. अब्दुल्लाह याने 53 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 37 रन्स केल्या. तर त्यानतंर सॅमने 52 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 रन्स केल्या. झटपट 2 विकेट्स गमावल्याने पाकिस्तानची स्थितीत 2 बाद 85 अशी झाली. त्यानंतर बाबर आझम आणि कॅप्टन मोहम्मज रिझवान या जोडीने पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
रिझवान आणि आझम या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नॉट आऊट 58 रन्सची पार्टनरशीप केली आणि पाकिस्तानला विजयी केलं. मोहम्मद रिझवान याने 2 षटकार आणि 1 चौकारासह 27 चेंडूत 30 धावांची नाबाद खेळी केली. तर बाबर आझम याने 4 फोरसह 30 बॉलमध्ये 28 धावा केल्या.
पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर कांगारु ढेर
दरम्यान त्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या खुर्दा उडवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अनुभवी खेळाडूंना सरावासाठी तिसऱ्या सामन्यातून ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलिया टीमला या निर्णयाचा फटका बसला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने झटके देत 26.5 ओव्हरमध्येच 143 धावांवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाच्या सीन एबॉट यानेच 30 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एकालाही पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. पाकिस्तानकडून शाहीन शाह अफ्रीदी आणि नसीम शाह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हरीस रौफने दोघांना बाद केलं. तर हसनैन याने 1 विकेट घेत इतरांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियात 22 वर्षानी एकदिवसीय मालिका विजय
A dream start for Mohammad Rizwan’s captaincy 🤩
Pakistan come from behind to complete a memorable 2-1 ODI series win Down Under against Australia 💪
📝 #AUSvPAK: https://t.co/4cmtKhImpB pic.twitter.com/OafKzKH6yd
— ICC (@ICC) November 10, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कूपर कॉनोली, मार्कस स्टॉइनिस, आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन आणि लान्स मॉरिस
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन.