10 बॉलमध्ये 50 रन्स, Marcus Stoinis ची मेगा ऑक्शनआधी स्फोटक खेळी, पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडला
Marcus Stoinis : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने मेगा ऑक्शनआधी तडाखेदार आणि स्फोटक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्टोयनिसने 5 फोर आणि 5 सिक्ससह नॉट आऊट 61 रन्स केल्या.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या मेगा ऑक्शनकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचे आणि खेळाडूंचं लक्ष लागून आहे. आयपीएलमधील 10 संघांना आगामी 18 व्या मोसमासाठी फक्त 204 खेळाडूंची गरज आहे. या 204 जागांसाठीएकूण 1 हजार 574 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहेत. त्यापैकी फक्त 204 खेळाडूंची ऑक्शमधून निवड केली जाणार आहे. या मेगा ऑक्शनआधी प्रत्येक खेळाडू आपली छाप सोडण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवतोय. ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने पाकिस्तान विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात तडाखेबंद खेळी केली. मार्कसने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
पाकिस्तानने विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 52 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मार्कस स्टोयनिस याने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 11.2 ओव्हरमध्ये हे विजयी आव्हान 7 विकेट्स राखून पूर्ण केलं. स्टोयनिसने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. स्टोयनिसने 27 बॉलमध्ये 225.93 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. स्टोयनिसच्या या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. याचाच अर्थ स्टोयनिसने 10 बॉलमध्ये 50 धावा केल्या.
विजयी हॅटट्रिक आणि पराभवाचा वचपा
ऑस्ट्रेलियाने या तिसऱ्या सामन्यासह विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला टी 20i मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप केलं. ऑस्ट्रेलियाने यासह एकदिवसीय मालिका पराभवाचा वचपा घेतला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत केलं होतं.
मार्कस स्टोयनिसची स्फोटक खेळी
A thunderous knock from Marcus Stoinis seals the T20I series whitewash for Australia 🔥#AUSvPAK: https://t.co/8SwCKOPHbc pic.twitter.com/cJS0HiqiI6
— ICC (@ICC) November 18, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झम्पा.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : आगा सलमान (कर्णधार), साहिबजादा फरहान, बाबर आझम, हसीबुल्ला खान (विकेटकीपर), उस्मान खान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, जहांदद खान, हरिस रौफ आणि सुफियान मुकीम.