AUS vs PAK : पाकिस्तानी खेळाडूची डेब्यू सामन्यातच पॅन्ट निघाली, कधीच विसरणार नाही, पाहा व्हीडिओ

Jhandad Khan Trousers Video : पाकिस्तानच्या जहांदाद खान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यातून पदार्पण केलं. जहांदाद खान याची सामन्यात पॅन्ट घसरली.

AUS vs PAK : पाकिस्तानी खेळाडूची डेब्यू सामन्यातच पॅन्ट निघाली, कधीच विसरणार नाही, पाहा व्हीडिओ
Jhandad Khan Trousers Video
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:55 PM

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पाकिस्तानला 3-0 ने क्लिन स्वीप केलं. मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून पाकिस्तानच्या जहांदाद खान याने पदार्पण केलं. अनेक खेळाडूंना पदार्पणात अविस्मरणीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. मात्र जहांदाद खान पदार्पणातील सामना कधीच विसरणार नाही. जहांदाद खान पहिल्याच सामन्यात ट्रोल झाला आहे. जहांदादची लाईव्ह सामन्यात पॅन्ट घसरली. जहांदादच्या पॅन्ट उतरल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पॅन्ट उतरली

ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिली ओव्हर शाहीन अफ्रिदी याने टाकली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने अफ्रिदीने टाकलेला बॉल फटकावला. जहांदाद ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने मारलेला बॉल रोखण्यासाठी सीमारेषेच्या दिशने जीव तोडून धावत निघाला. जहांदादने डाईव्ह मारुन बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात जहांदादची पॅन्ट घसरली. त्यामुळे जहांदादची मैदानात फजिती झाली. जहांदाद बॉल रोखण्यात अपयशी ठरल्याने चौकार गेला. त्यानंतर जहांदादने घसरलेली पॅन्ट सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जहांदादने उभं राहून पॅन्ट टाईट बांधली.

जहांदादची बॉलिंग

जहांदादने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यात बॉलिंगने आपली छाप सोडली. जहांदादने 3 ओव्हर बॉलिंग केली. जहांदादने 3 ओव्हरमध्ये 17 धावा देत 1 विकेट घेतली. जहांदादने जेक फ्रेझर-मॅकगर्क याला आऊट केलं.

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान पाकिस्तानने 18.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 117 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 117 धावांचं माफक आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 11.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. मार्कस स्टोयनिस ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. मार्कस 27 बॉलमध्ये याने 5 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 61 रन्स केल्या.

जहांदादची पॅन्ट घसरली

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झम्पा.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : आगा सलमान (कर्णधार), साहिबजादा फरहान, बाबर आझम, हसीबुल्ला खान (विकेटकीपर), उस्मान खान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, जहांदाद खान, हरिस रौफ आणि सुफियान मुकीम.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.