AUS vs PAK : कामरान गुलामची पॅट कमिन्सला ठसन! बाउंसवर टाकला आणि.. Watch Video
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पण या सामन्यातील एक ठसन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला 46.4 षटकात सर्वबाद 203 धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 33.3 षटकात 8 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानच्या वाटेला पहिली फलंदाजी आली होती. तेव्हा पाकिस्तानच्या कामरान गुलामने पॅट कमिन्सला राग दाखवण्याचा प्रयत्न केला. पण गुलामची सर्व मस्ती पुढच्या चेंडूवर उतरून गेली. पॅट कमिन्स संघाचं 19वं षटक टाकत होता. तेव्हा कामरान गुलाम स्ट्राईकला होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर गुलामने चेंडू डिफेंड केला आणि पुढे गेला आणि बॅट दाखवत कमिन्सला सांगितलं की, ‘वेट ऑन’ म्हणजे आता बघ..असं खरं तर स्टीव्ह स्मिथ करतो. ही त्याची स्टाईल आहे. तेव्हा कमिन्स त्याला काहीच बोलला नाही. हसतच चेंडू उचलला आणि निघून गेला.
पॅट कमिन्स भले काही बोलला नाही. पण त्याच्या डोक्यात कामरानने केलेली मस्ती घोंगावत होती. पाकिस्तानच्या गुलामला काहीच थांगपत्ता लागू न देता शॉर्ट चेंडूसाठी फिल्डिंग सेट करून दिली. यानंतर पॅट कमिन्स गुलामच्या डोक्यावर निशाणा साधत शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूने उसली घेतल्यानंतर कामरान बिथरला आणि चूक करून बसला. बॅकफूटला जाऊन डिफेंड करण्याच्या नादात ग्लव्ह्जला चेंडू लागला आणि जोश इंग्लिसने झेल पकडला. या विकेटसह कामरानची ठसन आणि त्याची खेळीही संपली. कामरानने 6 चेंडूंचा सामना केला आणि 1 चौकार मारत 5 धावा केल्या.
Pat Cummins wins the battle 🤫#AUSvPAK pic.twitter.com/zSJWnriUjD
— cricket.com.au (@cricketcomau) November 4, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार/विकेटकीपर), कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा.