Cricket | डेब्युमध्ये 5 विकेट्स घेणारा बॉलर कसोटी मालिकेतून बाहेर
Cricket | पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेऊन आपली छाप सोडणारा गोलंदाज हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. विकेटटेकर गोलंदाज बाहेर झाल्याने आता टीम अडचणीत सापडली आहे.
कॅनबेरा | पाकिस्तान क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी मोठा झटका लागला आहे. वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद हा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. खुर्रमच्या बरगडीला दुखापत झाली आहे. खुर्रम याने पर्थ कसोटीतून पदार्पण केलं होतं. खुर्रमने पदार्पणात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. खुर्रमने पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ याला दोन्ही डावात आऊट केलं होतं.
खुर्रमने पहिल्या सामन्यातली दुसऱ्या डावात मार्नस लबुशेन आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांना आऊट केलं. खुर्रमने दुसऱ्या डावात 45 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. खुर्रमने याला पहिल्या सामन्यात बॉलिंग दरम्यान त्रास जाणवत होता. त्यानंतर खुर्रमवर उपचार करण्यात आले. त्यानंतर खुर्रमला बरगड्यांमध्ये त्रास असल्याचं स्पष्ट झालं. आता दुखापतीमुळे बाहेर झाल्याने खुर्रमला मेलबर्न आणि सिडनीत होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही.
पाकिस्तानकडे आता 2 पर्याय आहेत.यामध्ये मोहम्मद वसी ज्युनिअर आणि हसन अली असे 2 पर्याय आहेत. नसीम शाह हा आशिया कपपासून दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो या दौऱ्यातून बाहेर पडला आहे. तर लेग स्पिनर अबरार अहमद पायाला असलेल्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळणार की नाही, याबाबत शंका आहे.
दरम्यान 1995 पासून पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाला एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. पाकिस्तानला या मालिकेतील पहिल्या सामन्यात 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या हिशोबाने करो या मरो असा असणार आहे. दुसरा सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
दुसऱ्या सामन्याआधी पाकिस्तानची पहिली विकेट
Another blow for Pakistan on their #WTC25 path 👇#AUSvPAKhttps://t.co/NonG6Av0lH
— ICC (@ICC) December 21, 2023
टेस्ट सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, कॅमेरुन ग्रीन, स्कॉट बोलँड आणि लान्स मॉरिस.
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम | शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), आगा सलमान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमेर जमाल, खुर्रम शहजाद मोहम्मद रिझवान, हसन अली, मीर हमजा, मोहम्मद वसीम जूनियर, नोमान अली, सॅम अयुब आणि अबरार अहमद.