AUS vs PAK : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर पाकिस्तानची जादू, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर होत आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान कमबॅक करेल असं चित्र आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया 6 बाद 187 धावांवर आहे.

AUS vs PAK : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर पाकिस्तानची जादू, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
AUS vs PAK : दुसरा कसोटी जिंकण्याची पाकिस्तानला संधी, तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा 'खेला होबे'
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 3:02 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी नऊ संघांची धडपड सुरु आहे. गुणतालिकेत टॉपला असलेल्या दोन संघांना अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. त्यामुळे टॉपला राहण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी मालिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने जबरदस्त कमबॅक केल्याचं दिसत आहे. 187 धावांवर 6 गडी बाद असं चित्र आहे. तसचे पहिल्या डावातील आघाडी पकडून ऑस्ट्रेलियाने 241 धावा जमवल्या आहेत. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे 4 गडी झटपट बाद करण्यात यश आलं आणि 300 धावांच्या आत रोखलं तर पाकिस्तानला विजयाची संधी आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी हा सामना आणखी रंजक वळणावर पोहोचणार आहे.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची आघाडी होती. त्यापुढे दुसऱ्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 6 गडी गमवून 187 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 241 धावांची आघाडी आहे. आता उर्वरित 4 गडी झटपट बाद करण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. एलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नाथन लियॉन, जोश हेझलवूड हे खेळाडू अजून बाकी आहेत. आघाडी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी डाव सावरला. स्टीव्ह स्मिथेने 50 आणि मिचेल मार्शने 96 धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी आणि मिर हमझा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. उस्मान ख्वाजा 0, डेविड वॉर्नर 6, मार्नस लाबुशेन 4, ट्रेव्हिस हेड 0 धावा करून तंबूत परतले. चौथ्या दिवशी या सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. या सामन्यातील जय पराजयावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मिर हमजा.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड.

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.