AUS vs PAK : बाबर आझम असताना शादाब खान याच्याकडे कर्णधारपद, नेमकं काय झालं ते जाणून घ्या

Australia Vs Pakistan Warm Up Match : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सराव सामना सुरु आहे. या सामन्याचं कर्णधारपद शादाब खान याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. बाबर आझम असताना असं केलं ते जाणून घ्या

AUS vs PAK : बाबर आझम असताना शादाब खान याच्याकडे कर्णधारपद, नेमकं काय झालं ते जाणून घ्या
World Cup : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शादाब खान याच्याकडे कर्णधारपद येताच बाबर आझमला दिला असा इशारा, म्हणाला "मी कॅप्टन आहे आणि..."
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 4:02 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संघ सराव सामने खेळत आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये पाकिस्तान ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा मैदानात शादाब खान आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. बाबर आझम याला नेमकं काय झालं आहे, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. बाबर आझमच्या गैरहजेरीत मोहम्मद रिझवानला संधी का दिली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याबाबर या सामन्यापुरता कर्णधार असलेल्या शादाब खान याने उत्तर दिलं आहे. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर शादाबने याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली.

काय म्हणाला शादाब खान?

“बाबर आझम ठीक आहे. त्याला आराम हवा होता. रिझवान सुद्धा आराम करत आहे. पण मी कर्णधार आहे (हसत) आणि त्याच्याकडून मेहनत करून घेईल. आम्ही मागचा सामना हरलो होतो. पण आज आम्ही जिंकणार. आम्ही एक कुटुंब आहोत तसेच चांगले मित्र आहोत. ही आमच्या टीमची जमेची बाजू आहे. आम्ही एका टीमच्या स्वरुपात हारू किंवा जिंकू. आमच्या आत्मविश्वास मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.”, असं शादाब खान याने सांगितलं.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंस याने सांगितलं की, खेळपट्टी चांगली दिसत आहे. ‘खेळपट्टी चांगली वाटत आहे. त्यामुळे आमच्या फलंदाजांना परखण्याची एक चांगली सधी आहे. 50 षटकांचा सामना होणार आहे. यात गोलंदाजांना 10 षटकं टाकावी लागू शकतात. त्यात काही अडचणीही येऊ शकतात.’, असंह त्याने पुढे सांगितलं.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सराव सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने 5 गडी गमवून 345 धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने 5 गडी गमवून 43.4 षटकात पूर्ण केलं.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, सौद शकील, सलमान अली आगा, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ, मोहम्मद वसीम.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.