AUS vs PAK T20 : ऑस्ट्रेलियाचं पाकिस्तानसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान गाठून पाकिस्तान मालिकेत बरोबरी करणार का? याकडे लक्ष लागून आहे.

AUS vs PAK T20 : ऑस्ट्रेलियाचं पाकिस्तानसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 3:21 PM

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आमनेसामने आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 7 षटकांचा करण्यात आला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने 7 षटकात 4 गडी गमवून 93 धावा केल्या आणि विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान काही पाकिस्तानला गाठता आलं नाही. पाकिस्तानने 7 षटकात 9 गडी गमवून 64 धावा केल्या आणि 29 धावांनी दारूण पराभव झाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला काहीही करून कमबॅक करायचं आहे. जर हा सामना गमवला तर मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगुर्क यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागदारी केली. जेक बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कर्णधार जोश इंग्लिस आला तसा तंबूत गेला. त्याला आपलं खातंही खेलता आलं नाही. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 20 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या.

पाकिस्तानकडून हारिस रउफने जबरदस्त गोलंदाजी केली त्याने 4 षटकात 4 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटला ढकललं. हारिस रउफने 4 षटकात 23 धावा देत 47 गडी बाद केले.तर सुफियन मुकीमने 2 गडी बाद केल. अब्बास अफ्रिदीने एक गडी बाद केला. शहीन अफ्रिदी आणि नसीम शाह यांनी आपला टी20 स्पेल पूर्ण केला पण एकही विकेट घेता आला नाही. शाहीनने 4 षटकात 39 धावा दिल्या. तर नसीमने 44 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 9 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, सुफियान मुकीम.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (विकेटकीपर/कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मार्कस स्टॉइनिस, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.