इंग्लंडला मायदेशात 5 सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पराभूत केलं. ऑस्ट्रेलिया त्यानंतर आता महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पाकिस्तान विरूद्ध वनडे आणि टी 20I मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया मायदेशात नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तान विरुद्ध टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकदिवसीय मालिकेला 4 नोव्हेंबरपासून तर टी 20I सीरिजला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून आधीच एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर टी 20I मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या टी 20I मालिकेसाठी युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टी 20I मालिकेत कांगारुंचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड हे दोघेही उपलब्ध नाहीत. तसेच वनडे कॅप्टन पॅट कमिन्स पाकिस्तान विरुद्ध टी 20I मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल, एडम झॅम्पा, मॅथ्यू शॉर्ट आणि आरोन हार्डी यापैकी कुणालाही नेतृत्वाची धुरा मिळू शकते. या चौघांना बीग बॅश लीग स्पर्धेत नेतृत्वाचा अनुभव आहे.
टी 20I सीरिजसाठी संघात झेव्हियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि स्पेन्सर जॉन्सन यांचं कमबॅक झालं आहे. हे तिघेही दुखापतीतून पूर्णपणे फिट झाले आहेत.
पाकिस्तान विरुद्ध टी 20i सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम
Introducing our Men’s T20I squad to take on @TheRealPCB next month 🇦🇺 🇵🇰 pic.twitter.com/5TdEF3EqMd
— Cricket Australia (@CricketAus) October 28, 2024
पहिला सामना, गुरुवार 14 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
दुसरा सामना, शनिवार 16 नोव्हेंबर, सिडनी
तिसरा सामना, 18 नोव्हेंबर, होबार्ट
टी 20I सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : सीन एबॉट, झेव्हियर बार्टलेट, कूपर कोनोली, टीम डेव्हिड, नाथन एलिस, झॅक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस आणि एडम झॅम्पा.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), अराफात मिन्हास, बाबर आजम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह, जहांदाद खान, मोहम्मद अब्बास अफरीदी,मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमैर बिन यूसुफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मोकीम आणि उस्मान खान.