SA vs AUS 1st Odi | मार्नस लॅबुशेन-एश्टन एगर जोडीचा धमाका, ऑस्ट्रेलिया 3 विकेट्सने विजयी
Marnus Labuschagne | दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 223 धावांचा बचाव करताना शानदार बॉलिंग केली. मात्र मार्नस लाबुशेन आणि एश्टन एगर जोडीसमोर दक्षिण आफ्रिकाचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
मुंबई | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. मार्नस लॅबुशेन आणि एश्टन एगर या जोडीने आठव्या विकेटसाठी नाबाद विजयी भागीदारी रचली. या दोघांनीच ऑस्ट्रेलियाला अडचणीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिेकेने कॅप्टन टेम्बा बावुमा याच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 223 रन्सचं टार्गेट दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने ते आव्हान 40.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
कन्कशन सब्टीट्युड मार्नस लॅबुशेन आणि एश्टन एगर हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 112 धावांची नाबाद भागीदारी केली. मार्नसने 93 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने नाबाद सर्वाधिक 80 धावा केल्या. एश्टन एगर याने लॅबुशेन याला चांगली साथ देत नॉट आऊट 48 धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 33 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन मिचेल मार्श आणि मार्क्स स्टोयनिस या दोघांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. एलेक्स कॅरी 3, जोश इंग्लिस 1 आणि सीन एबोटने 9 धावा केल्या.तर डेव्हिड वॉर्न आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.
मार्नस लॅबुशनचा वन मॅन शो
An unbeaten century stand between Marnus Labuschagne and Ashton Agar helps Australia take a 1-0 lead in the ODI series 👏#SAvAUS 📝: https://t.co/CI4E0zZ0Tp pic.twitter.com/dXAp9aE7r8
— ICC (@ICC) September 7, 2023
दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि गेर्लाड कॉत्झी या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन, लुंगी एन्गिडी आणि केशव महाराज या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून आफ्रिकेला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं. दक्षिण आफ्रिकेचा डाव ढेपाळला. मात्र कॅप्टन टेम्बा बावुमा याने लाज राखली. शेवटपर्यंत एकटा लढला. टेम्बाने शतक केलं. त्यामुळे आफ्रिकेने 49 ओव्हरमध्ये ऑलआऊट 222 धावा केल्या. टेम्बाने सर्वाधिक 114 धावांची शतकी खेळी साकारली. तर मार्को जान्सेन याने 32 धावांचं योगदान दिलं. इतरांना विशेष काही करता आलं नाही.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वात जास्त 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मार्कस स्टोयनिसने दोघांचा काटा काढला. तर सीन एबोट, एडम झॅम्पा, कॅमरुन ग्रीन आणि एश्टन एगर या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, जोश हेझलवूड आणि एडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.