AUS vs ENG | श्रीलंकेची पराभवाची हॅटट्रिक, कांगारुंचा वर्ल्ड कपमधील पहिला विजय
Australia vs Sri Lanka Icc World Cup 2023 | ऑस्ट्रेलियाने 2 पराभवानंतर विजयाचं खातं उघडलं आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर वर्ल्ड कप इतिहासातील नववा विजय मिळवला आहे.
लखनऊ | ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलग 2 पराभवानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला विजय ठरला आहे. तर श्रीलंकेने पराभवाची हॅटट्रिक केली आहे. श्रीलंकाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 210 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 35.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 215 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोयनिस या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. मिचेल मार्श, जोश इंग्लिस आणि एडम झॅम्पा हे तिघे ऑस्ट्रेलियाच्या विजयाची हिरो ठरले.
ओपनर मिचेल मार्श याने 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. डेव्हिड वॉर्नर 11 धावा करुन माघारी परतला. स्टीव्हन स्मिथ याला भोपळाही फोडता आला नाही. मिडल ऑर्डरमध्ये मार्नस लबुशेन याने 60 बॉलमध्ये 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विकेटकीपर बॅट्समन जोस इंग्लिस याने सवाधिक 58 धावा केल्या. जोसने 59 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह ही निर्णायक खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद 31 धावा केल्या. तर मार्कस स्टोयनिस 20 रन्सवर नॉट आऊट राहिला. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंका याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दुनिथ वेल्लालागे याने 1 विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.