AUS vs SL Toss | ऑस्ट्रेलिया की श्रीलंका टॉस कुणी जिंकला? पाहा दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन
Australia vs Sri Lanka Toss | श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड कप 2023 मधील पहिला विजय नोंदवण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही टीमची प्लेईंग ईलेव्हन पाहा.
लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 14 व्या सामन्यात आज 16 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना लखनऊमधील अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता सामना सुरु होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन कुसल मेंडीस याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 2 सामने खेळले आहेत.दोन्ही टीमना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.
सलग 2 सामने गमावल्यानंतर श्रीलंका टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 केले आहेत. चमिका करुणारत्ने आणि लाहिरू कुमारा या दोघांना संधी देण्यात आली आहे. मथीशा पथिराणा आणि दासुन शनाका हे दोघे खेळत नाहीयेत. श्रीलंकेचा नियमित कर्णधार दासून शनाका हा दुखापतीच्या कचाट्यात सापडला आहे. दासून दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे नेतृत्वाची सर्व सूत्रं ही अनुभवी कुसल मेंडीस याच्याकडे देण्यात आली आहेत. तर ऑस्ट्रेलियाने आपल्या 11 खेळाडूंवर विश्वास ठेवत प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कांगारु श्रीलंकावर वरचढ
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया या 10 सामन्यांमध्ये वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 8 सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला केवळ एकदाच उलटफेर करण्यात यश मिळवता आलेलं आहे. दरम्यान या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांना विजयी ओपनिंग करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या आणि श्रीलंका आठव्या स्थानी आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणती टीम विजयी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकला
Kusal Mendis won the toss and elected to bat first! #CWC23 #SLvAUS #LankanLions pic.twitter.com/veoToJTtCg
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 16, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.