AUS vs WI : कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं राज्य, वेस्ट इंडिज बॅकफूटवर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु असून ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसावर मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलेला आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून प्रत्येक सामन्याचं महत्त्व आहे. एखाद्या सामन्याचा निकाल गुणतालिकेचं संपूर्ण चित्र पालटून टाकतो. त्यामुळे जय पराजय आणि सामना बरोबरीत सोडवणं हे खूपच महत्त्वाचं आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलेला दिसला. कारण पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजला सर्वबाद फक्त 188 धावा करता आल्या. तर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर दोन गडी गमवून 59 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे.
वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिजकडून किर्क मॅकेन्झी सोडला तर एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. शेवटी आलेल्या शामर जोसेफने 36 धावांची भर घातली. या व्यतिरिक्त बाकीचे फलंदाज मैदानात आले नाही हजेरी लावून गेले. क्रेग ब्रॅथवेट आमि टॅगेनारिन चंद्रपॉल ही जोडी मैदानात उतरली. संघाच्या 14 धावा असताना चंद्रपॉलच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला फक्त 6 धावा करता आल्या. त्यानंदर क्रेग ब्रॅथवेट 13 धावा करून तंबूत परतला. पण एका बाजूने किर्क मॅकेन्झीने खेळी सुरुच ठेवली. पण इतर फलंदाज हजेरी लावून जात होते.
The #MenInMaroon have some success in the afternoon session to make for a decent day of test cricket, with Shamar Joseph picking up 2️⃣ wickets! #AUSvWI pic.twitter.com/2prQYL86vu
— Windies Cricket (@windiescricket) January 17, 2024
एलिक अथानाझे 13, कावेम हॉज 12, जस्टिन ग्रीव्हज 5, जोशुआ दा सिल्वा 6, अल्झारी जोसेफ 14, गुडाकेश मोटी 1 असे बाद झाले. किर्क मॅकेन्झीने 94 चेंडूत 50 धावांची खेळी केली आणि बाद झाला. तर शामर जोसेफने 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4, पॅट कमिन्सने 4, मिचेल स्टार्कने 1 आणि नाथन लियॉनने 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाचा डाव
स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा ही जोडी सलामीला उतरली होती. पहिल्या गड्यासाठी 25 धावांची भागीदारी केली. पण स्टीव्ह स्मिथच्या रुपाने पहिला धक्का बसला. 12 धावा करून तंबूत परतला. तर मार्नस लाबुशेनही काही खास करू शकला नाही. 10 धावांवर असताना तंबूत परतला. या दोन्ही खेळाडूंना शामर जोसेफने तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा उस्मान ख्वाजा नाबाद 30 आणि कॅमरोन ग्रीन नाबाद 6 धावांवर खेळत होता.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, एलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, केमार रोच, शामर जोसेफ
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड