AUS vs WI 2nd Test | ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Australia vs West Indies 2nd Test Match | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया विंडिजला व्हाईटवॉश देणार की विंडिज बरोबरी करणार?
ब्रिस्बेन | वेस्ट इंडिज क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ऑलआऊट 193 धावा केल्या. तसेच विंडिजकडे पहिल्या डावातील 23 धावांची आघाडी होती. या जोरावर ऑस्ट्रेलियाला 216 धावाचं आव्हान मिळालंय. आता ऑस्ट्रेलिया हे आव्हान पूर्ण करुन सलग दुसरा विजय मिळवते की वेस्ट इंडिज कांगारुंना रोखून मालिकेत विजयी खातं उघडते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
विंडिजकडून दुसऱ्या डावात एका फलंदाजालाही अर्धशतकी खेळीही करता आली नाही. मात्र मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी छोटेखानी खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजला 193 धावांपर्यंत पोहचता आलं. विंडिजकडून किर्क मॅकेन्झी याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. तर ॲलिक अथानाझे याने 35 धावांचं योगदान दिलं. जस्टिन ग्रीव्हस याने 33 धावा केल्या. कावेम हॉज याने 29 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन क्रेग ब्रेथवेट याने 16 आणि केविन सिंक्लेअर याने नाबाद 14 धावा केल्या.
चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जोशुआ दा सिल्वा 7, टॅगेनारिन चंद्रपॉल 4, शामर जोसेफ 3 (रिटायर्ड हर्ट) आणि केमार रोच याने 1 धावा केली. तर अल्झारी जोसेफ याला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि जोश हेझलवूड या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलिया की विंडिज कोण जिंकणार?
Shamar Joseph has to retire hurt after this toe-crusher from Mitch Starc!
Australia need 216 to win #AUSvWI pic.twitter.com/3gAucaEfwg
— cricket.com.au (@cricketcomau) January 27, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शामर जोसेफ.