AUS vs WI 2nd Test | वेस्ट इंडिजचा उलटफेर, ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी थरारक विजय
AUS vs WI 2nd Test Match Highlights In Marathi | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी थरारक विजय मिळवला आहे.
गाबा | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्याच चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर तब्बल 27 वर्षांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांचे आव्हान दिले होते. मात्र विंडिच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं. विंडिजने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 19 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 60 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 156 धावांची गरज होती. तर दु्सऱ्या बाजूला विंडिजला 8 विकेट्स हव्या होत्या. चौथ्या दिवशी दोन्ही बाजूने कडवी टक्कर पाहायला मिळाली. स्टीव्हन स्मिथने चिवटपणे एक बाजू लावून धरली होती. स्मिथने टीमसाठी नाबाद 91 धावा केल्या. मात्र विंडिजच्या गोलंदाजांनी कांगारुंना 207 धावांवर गुंडाळत कार्यक्रम केला.
सामन्याचा धावता आढावा
विंडिजने टॉस जिंकून पहिल्या डावात ऑलआऊट 311 धावा केल्या. कांगारुंनी या प्रत्युत्तरात 9 बाद 289 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे विंडिजला 22 धावांची आघाडी मिळाली. विंडिजने या आघाडीसह दुसऱ्या डावात 193 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 धावांचं आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलिया हे आव्हान सहज पूर्ण करेल, असं वाटत होतं. मात्र विंडिजने ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने झटके देणं सुरु ठेवलं होतं. तर दुसऱ्या बाजूने ओपनर स्टीव्हन स्मिथ याने एक बाजू लावून धरली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ न मिळाल्याने स्टीव्हन स्मिथ याची नाबाद 91 धावांची खेळी वाया गेली.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्टीव्हन व्यतिरिक्त कॅमरुन ग्रीन याने 42, मिचेल स्टार्क 21, उस्मान ख्वाजा आणि मिचेल मार्श प्रत्येकी 10-10 धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांचा 10 च्या आत कार्यक्रम झाला.
ऐतिहासिक विजयी क्षण
WEST INDIES HAS WON A TEST MATCH AT GABBA 🤯
– Shamar Joseph is the hero. pic.twitter.com/d9zqVfcOpP
— Johns. (@CricCrazyJohns) January 28, 2024
शामर जोसेफ विजयाचा हिरो
डेब्यूटंट शामर जोसेफ हा विंडिजच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला. शामरने दुसऱ्या डावात 7 आणि पहिल्या डावात 1 अशा एकूण 8 विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला. तसेच इतर सहकाऱ्यांनीही शामरला चांगली साथ देत कांगारुंना रोखणयात यश मिळवलं.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शामर जोसेफ.