Andre Russell | 6,0,4,6,6,6… आंद्रे रसेलची वादळी खेळी, झॅम्पाला फोडला
Andre Russell Adam Zampa Video | आंद्रे रसेल याने आपला एंग्री अवतार दाखवत एडम झॅम्पा याला झोडून काढला. रसेलने एका ओव्हरमध्ये 4 चौकारांसह 28 धावा केल्या.
पर्थ | ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी20 क्रिकेट सामन्यात आक्रमक फलंदाज आंद्रे रसेल याने तडाखेदार खेळी केली. आंद्रे रसेल याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 71 धावांची तडाखेदार खेळी केली. रसेलने या खेळी दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. तसेच आंद्रे रसेल याने एडम झॅम्पा याची हेकडी काढली. रसेलने 19 व्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा काढल्या. या जोरावर विंडिजला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 220 धावांपर्यंत मजल मारता आली.
आंद्रे रसेल याने 29 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. आंद्रे रसेलने विंडिजच्या डावातील 19 ओव्हरमध्ये टॉप गिअर टाकत वादळी खेळी केली. रसेलने एडम झॅम्पाची धुलाई केली. रसेलने झॅम्पाच्या ओव्हरमध्ये 4 सिक्सच्या मदतीने 28 धावा केल्या. रसेलने पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. दुसरा बॉल डॉट केला. तिसऱ्या बॉलवर चौकार लगावला. चौथ्या बॉलवर पुन्हा सिक्स लगावला. तप पाचव्या बॉलवर सिक्ससह अर्धशतक ठोकलं. रसेल इथेच थांबला नाही, तर ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवरही सिक्स ठोकला. रसेलने अशाप्रकारे एडम झॅम्पाचा माज मोडून काढला.
रसेल-रुदरफोर्डचा वर्ल्ड रेकॉर्ड
रसेल आणि शेरफेन रुदरफोर्ड या जोडीने ऑस्ट्रेलियाची धुलाई केली. शेरफेन रुदरफोर्ड आणि आंद्रे रसेल या जोडीने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. या जोडीने टी 20आय क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 139 रन्सची पार्टनरशीप झाली. शेरफेन याने नाबाद 40 बॉलमध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली.
रसेलकडून झॅम्पाची धुलाई
Bang! Andre Russell is seeing them nicely at Perth Stadium.
Tune in on Fox Cricket or Kayo #AUSvWI pic.twitter.com/DoUaQghJiZ
— cricket.com.au (@cricketcomau) February 13, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), ॲडम झाम्पा, झेवियर बार्टलेट, स्पेन्सर जॉन्सन, जेसन बेहरेनडॉर्फ
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.