AUS vs WI : आराsssराsss खतरनाक | मॅक्सवेलचं वादळी शतक, 109 मीटरचा गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ
Glenn Maxwell hundred against west indies : ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का असलेल्या ग्लेन मॅक्सवेल याने आक्रमक शतकी खेळी केली आहे. आपल्या शतकी खेळीने सर्वांना धडकी भरवली आहे. या खेळीमधील एक तगडा सिक्सरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मालिका सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने धडाकेबाज शतकी खेळी केली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपआधी मॅक्सवेलने आपली शानदारी खेळीने सर्वांना धडकी भरवली आहे. वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मॅक्सवेलने शतक ठोकलं आहे. या शतकामध्ये मॅक्सवेलने 109 मीटरचा तगडा षटकार मारला आहे. व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ:-
109 metres!
Massive from Maxwell #AUSvWI pic.twitter.com/BFtUxWClEl
— cricket.com.au (@cricketcomau) February 11, 2024
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिमधील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा बॅटींगला उतरला होता. पहिल्यांदा बॅटींग करताना कांगारूंनी 20 ओव्हरमध्ये 241-4 धावा केल्या होत्या. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल याने 55 चेंडूंत 12 चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या. यामध्ये 12 चौकार आणि 8 षटकार मारले.
अल्जारी जोसेफ याच्या12 व्या ओव्हरमध्ये मॅक्सवेलने तगडा सिक्सर मारला. डीप मिड-विकेटला मारलेला चेंडू 109 मीटर इतका लांब हा बॉल गेला. ऑस्ट्रेलियाची अवस्था खराब होती, मात्र संघ अडचणीत असताना मॅक्सवेलने अनेकवेळा उपयुक्त खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिजसमोर 200 पेक्षा जास्त धावा केल्या.
दरम्यान, ग्लेन मॅक्सवेल याने या शतकासह टी-20 क्रिकेटमध्ये पाच शतके केली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याची याआधी सर्वाधिक शतके होतीत. आता मॅक्सवेलनेही या विक्रमाचा मानकरी ठरला आहे. मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना 102 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 2405 धावा आणि 40 विकेट घेतल्या आहेत.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (WK), शाई होप, रोव्हमन पॉवेल (C), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (C), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (WK), ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेसन बेहरेनडॉर्फ, जोश हेझलवूड