AUS vs WI T20 : ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजला पाजलं पराभवाचं पाणी, 11 धावांनी दिली मात

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर 11 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण 11 धावांनी वेस्ट इंडिजला पराभव सहन करावा लागला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो डेविड वॉर्नर

AUS vs WI T20 : ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजला पाजलं पराभवाचं पाणी, 11 धावांनी दिली मात
AUS vs WI T20 : पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलिया काठावर पास, अवघ्या 11 धावांनी मिळवला वेस्ट इंडिजवर विजय
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:50 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण डेविड वॉर्नर नावाच्या वादळाने हा निर्णय फोल ठरवला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 गडी गमवून 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान ठेवलं. वेस्ट इंडिजने 8 गडी गमवून 202 धावांपर्यंत मजल मारली. यासह वेस्ट इंडिजचा पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी पराभव झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. 36 चेंडूत 70 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या व्यतिरिक्त जोश इंग्लिस आणि टिम डेविड याने चांगली खेळी केली. तर वेस्ट इंडिजकडून रस्सेलने 3, अल्झारी जोसेफने 2, तर होल्डर आणि शेफर्डने प्रत्येकी एक गडी बाद केला.

वेस्ट इंडिजचा डाव

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ब्रँडन किंग आणि जॉनसन चार्ल्स यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 89 धावांची भागीदारी केली. 8 षटकात 10 च्या सरासरीने रेपो मेंटेंन ठेवला होता. पण चार्ल्स आमि ब्रँडन किंग बाद झाल्यानंतर घसरण लागली. ब्रँडन किंगने 53, तर जॉनसन चार्ल्सने 42 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त कोणीही खास खेळी करू शकलं नाही. आक्रमकपणे फटकेबाजी करताना धावांऐवजी विकेट देऊन बसले. जेसन होल्डरने शेवटी येत 15 चेंडूत 34 धावा केल्या. पण विजयाच्या वेशीवर संघाला आणता आलं नाही.आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 11 फेब्रुवारीला पुढचा सामना होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शॉन एबॉट, एडम झम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ, जोश हेझलवूड

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.