AUS vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धची ‘ती’ चूक ऑस्ट्रेलियाला भोवली, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उलटफेर
ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणं म्हणजे कठीणच आहे. याची प्रचिती नुकतीच पाकिस्तान संघाला आली आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने गमवावी लागली. त्यानंतर वेस्ट इंडिजवरही अशीच पाळी येईल वाटलं होतं. पण मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. खऱ्या अर्थाने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अतिशहाणपणा नडला असंच म्हणावं लागेल.
मुंबई : ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यात झालेली दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं. हा सामनाही ऑस्ट्रेलियाच जिंकेल असंच भाकीत अनेकांनी वर्तवलं होतं. पण वेस्ट इंडिजने सर्वच भाकीत खोटी ठरवली. दुसऱ्या कसोटी सामना 8 धावांनी जिंकलाय. चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाला पराभूत करत 27 वर्षानंतर इतिहास रचला. या विजयामुळे वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यालाही अश्रू अनावर झाले. समालोचन करत असताना अश्रूंना मोकळी वाट मिळाली. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक अतिशहाणपणा चांगलाच नडला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने 10 गडी गमवून 311 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी बाद 289 धावा केल्या आणि डाव घोषित केला. 22 धावांची आघाडी वेस्ट इंडिजकडे असताना आणि हातात एक गडी असूनही ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा निर्णय चांगलाच महागात पडला.
वेस्ट इंडिजने 22 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात 10 गडी गमवून 193 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियन संघ या धावा सहज गाठेल असं वाटत होतं. पण पण झालं असं की ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 207 धावा करता आल्या आणि 8 धावांनी वेस्ट इंडिजने विजय मिळवला. शामर जोसेफ या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचे 7 गडी तंबूत पाठवले.
The latest #WTC25 standings following 24 hours of box office Test match cricket 🎟#AUSvWI #INDvENG pic.twitter.com/YL6C4oJGwQ
— ICC (@ICC) January 29, 2024
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला विजयी टक्केवारीत फटका बसला आहे. पण पहिलं स्थान अबाधित आहे. तर वेस्ट इंडिजने इंग्लंडला मागे टाकलं आहे. त्यामुळे इंग्लंड भारताविरुद्ध विजय मिळवून फारसा फायदा झालेला नाही. ऑस्ट्रेलिया विजयी टक्केवारी 55 सह पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश विजयी टक्केवारी 50 असून संयुक्तिकरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारताला पहिल्या कसोटीमुळे फटका बसला असून 43.33 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावरून पाचव्या घसरण झाली आहे. पाकिस्तानचा संघ 36.66 टक्क्यांसह सहाव्या, तर वेस्ट इंडिजने 33.33 टक्क्यांसह सातवं स्थान गाठलं आहे. इंग्लंडचा 29.16 टक्क्यासंह आठव्या स्थानावर आहे.