IND vs AUS World Cup Final | ऑस्ट्रेलियासमोर तुलनेने कमी धावांचे लक्ष्य असताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे धोकादायक ठरु शकणारे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. टीम इंडियासाठी ही एक चांगली बाब आहे. पावरप्लेमध्ये टीम इंडियाच टिच्चून गोलंदाजी करते तसेच विकेटही काढते. यात विकेट काढण्याचा सिलसिला कायम आहे. पण धावा थोड्या जास्त आहेत. बातमी लिहित असताना ऑस्ट्रेलियाच्या 5 ओव्हरमध्ये 41 धावा झाल्या आहेत. त्यांचे 2 फलंदाज तंबूत परतले आहेत. टीम इंडियाला 240 धावांचा बचाव करायचा आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना आज सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. सुरुवातदेखील तशीच केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नर (7) आणि मिचेल मार्श (15) तंबूत परतले आहेत. वॉर्नरला मोहम्मद शमीने विराट कोहलीकरवी झेलबाद केलं. त्याने 3 चेंडूत 7 धावा करताना एक चौकार मारला. तेच दुसरा फलंदाज मिचेल मार्शला 15 चेंडूत 15 रन्सवर आऊट झाला. मार्शला बुमराहाने एका अप्रतिम चेंडूवर विकेटकीपर केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्याने एक फोर, एक सिक्स मारला. 6 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 42 धावा झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन दबाव वाढवून ठेवला. वॉर्नर आणि मार्श लवकर तंबूत परतण टीम इंडियाच्या दृष्टीने फायद्याच आहे. कारण कमी चेंडूत मॅचचा नूर पालटण्याची त्यांची क्षमता आहे.
LBW!
And Jasprit Bumrah has another 🔥🔥
Steve Smith departs and Australia are 3 down!
Follow the match ▶️ https://t.co/uVJ2k8mWSt#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #Final | #INDvAUS pic.twitter.com/LrrYpqs0UR
— BCCI (@BCCI) November 19, 2023
जसप्रीत बुमराहचा अप्रतिम चेंडू
ऑस्ट्रेलियाचा तिसरा विकेट गेला आहे. जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर स्टीव्ह स्मिथला LBW आऊट केलं. त्याने 9 चेंडूत 4 धावा करताना एक चौकार मारला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल तिघांनीच धावा केल्या. अन्य फलंदाजांनी निराश केलं. अन्यथा टीम इंडियाची धावसंख्या 240 च्या पुढे गेली असती. टीम इंडियाच्या 76 धावांवर 2 विकेट गेल्या होत्या. त्या तुलनेत 47 रन्सवर तीन विकेट गेल्या आहेत.