Cricket news: 2 दौरे, 3 मालिका आणि 11 सामने, टीमची घोषणा, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला बाहेरचा रस्ता
Cricket News: विश्व विजेता क्रिकेट संघ 2 देशांचा दौरा करणार आहे. टीम या दौऱ्यात एकूण 3 मालिका खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर द्विपक्षीय मालिकांना सुरुवात झाली आहे. टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने झिंबाब्वे विरुद्ध 4-1 फरकाने टी 20 मालिका जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया जुलैअखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वनडे वर्ल्ड कप विजेता संघ ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड आणि इंग्लंड असे 2 दौरे करणार आहे.ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात दोन्ही संघांविरुद्ध एकूण 11 सामने खेळणार आहे. या दोन्ही देशांच्या दौऱ्यांसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे.ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्कॉटलँड दौऱ्याची सुरुवात ही 4 सप्टेंबरपासून होणार आहे. तर 7 सप्टेंबरला सांगता होणार आहे. ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हे द ऑरेन्ज, एडीनबर्ग येथे आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया 11 ते 29 सप्टेंबर दरम्यान इंग्लंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कूपर कोनोली आणि जॅक फ्रेजर या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर पॅट कमिन्स आणि इतर अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांची निवड केवळ इंग्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी करण्यात आली आहे. तसेच स्पिन ऑलराउंडर एश्टन एगर आणि मॅथ्यू वेड या दोघांना निवडीसाठी उपलब्धं नसल्याने संधी मिळाली नाही.
मिचेल मार्श कॅप्टन
मिचेल मार्श या दोन्ही दौऱ्यातील 3 मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. नियमित आणि वर्ल्ड कप विनर कॅप्टन पॅट कमिन्स याला विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया 2024 अखेरीस भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी येणार आहे. पॅटला त्या अनुषगांने विश्रांती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्कॉटलँड आणि इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक
Eyes on the future 👀
Australia inject youth in their squads for the white-ball tour of the United Kingdom to face Scotland and England 👇https://t.co/riZexYYCIO
— ICC (@ICC) July 15, 2024
स्कॉटलँड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा. इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी
इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, जेक फ्रेझर मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ , मिचेल स्टार्क आणि ॲडम झॅम्पा.