ODI World Cup 2023 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, कॅप्टन कोण?
ODI World Cup 2023 Australia Squad : वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रिलिया क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. आफ्रिका दौऱ्यावरील तीन खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. पाहा कॅप्टनपदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आलीये.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर पाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया संघानेही आपल्या संघाची घोषणा केलीये. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या स्क्वॉडमधील तीन खेळाडूंना डच्चू देत 15 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आलेल्या एका खेळाडूने पाच दिवसांआधी आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात डेब्यू केला होता. त्यानेही दमदार कामगिरी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली होती. मात्र त्याला वर्ल्ड कप संघामध्ये जागा बनवता आली नाही
या खेळाडूंना आलं वगळण्यात?
ऑस्ट्रेलिया संघाने आपली 15 नावं जाहीर केली आहेत. तनवीर सांघा, अॅरॉन हार्डी आणि वेगवान गोलंदाज नॅथन एलिस यांना वगळण्यात आलं आहे. यामधील तनवीर सांंघा याने आता गेल्या पाच दिवसांआधी डेब्यू केला होता. या खेळाडूंंना डच्चू देण्यात आला असला तरी 28 सप्टेंबरपर्यंत संघामध्ये बदल केला जावू शकतो. सर्व संघांना आधी आपल्या संघाची घोषणा करायची होती. आणखी वीस दिवस आहेत जर संघात काही बदल करायचा असल्यास करू शकता.
Presenting your 15-player men’s provisional squad for the 2023 World Cup!
The final 15-player squad will be confirmed later this month 🇦🇺 #CWC23 pic.twitter.com/wO0gBbadKi
— Cricket Australia (@CricketAus) September 6, 2023
दरम्यान, 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आमची कामगिरी खराब राहिली होती. आता आम्ही नव्या ऊर्जने मैदानात उरणार असून भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यास आम्ही उत्सुक असून कप जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार असल्याचं ऑस्ट्रेलिया संघाचा स्पिनर अॅडम जम्पा याने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपासाठी संघ:-
पॅट कमिन्स (c) , स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोस इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅस्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा आणि मार्कस स्टॉइनिस.