सिडनी : आज फायनलने IPL 2023 च्या सीजनची सांगता होईल. हा आयपीएलचा 16 वा सीजन आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीम्स आमने-सामने आहेत. कालचा दिवस पावसामुळे वाया गेला. अन्यथा कालच सीजनची सांगता झाली असती. आज होणाऱ्या फायनलवर सगळ्यांच लक्ष असेल. आज विजेता संघ ठरल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष असेल, ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलवर.
इंग्लंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. WTC Final 2023 साठी टीम इंडियाने आधीच संघ जाहीर केलाय. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुद्धा WTC फायनलसाठी आपली टीम जाहीर केलीय.
फिटनेसची चिंता असूनही त्याची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड
फिटनेसची समस्या असूनही जोश हेझलवूडची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झालीय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीय खेळाडूंची यादी सोपवली आहे.
दुखापतीच्या समस्येमुळे जोश हेडलवूडने आयपीएल सीजनच्या मध्यावर माघार घेतली होती. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची टीममध्ये निवड केलीय. 7 जून पासून लंडनमधील द ओव्हल येथे टेस्ट फायनल होणार आहे.
32 वर्षीय जोश हेझलवूड ऑल राऊंडर मिचेल मार्श आणि बॅट्समन मॅथ्यू रेनशॉ यांची जागा घेणार आहे. ते मूळ टीमचा भाग होते. पॅट कमिन्ससह स्कॉट बोलँड आणि मिचेल स्टार्क हे वेगवान गोलंदाजीची धुरा वाहतील.
बीसीसीआयने तीन आठवडे आधीच निवडली टीम
केएल राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर त्याची जाग विकेटकिपर इशान किशनने घेतली आहे. बीसीसीआयने WTC फायनलसाठी तीन आठवडेआधीच टीम जाहीर केली होती.
ऑस्ट्रेलियन टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लेयॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर,
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, आर.अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन,