Retirement | माजी कर्णधार निवृत्ती घेण्याच्या तयारीत? जवळच्या व्यक्तीचा खुलासा
Test Cricket Retirement | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज माजी कर्णधार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. कोण आहे तो स्टार खेळाडू?
मुंबई | ऑस्ट्रेलियाचा दिग्ग्ज आणि अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ हा डेव्हिड वॉर्नर याच्या प्रमाणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नाही. मी अजूनही खूप काही करु शकतो, असं माजी कर्णधार राहिलेल्या स्टीव्हन स्मिथ याला वाटतं. याबाबतची माहिती स्टीव्हनचा मॅनेजर वारेन क्रेग याने दिली आहे. डेव्हिड वॉर्नर याने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय.
स्टीव्हन स्मिथ याला टीम इंडिया आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यानंतर स्टीव्हन स्मिथ निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. स्टीव्हन स्मिथ याने कसोटी क्रिकेटमध्ये अफलातून एव्हरेजने धावा केल्या आहेत. मात्र स्टीव्हनची सध्याची कामगिरी पाहता त्याला धावांसाठी जोरदार संघर्ष करायला लागत आहे.
स्टीव्हन स्मिथ याचं करियर
स्टीव्हन स्मिथ याने ऑस्ट्रेलियाचं 102 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. स्टीव्हनने 102 सामन्यांमध्ये 58.61 च्या सरासरीने 9 हजार 320 धावा केल्या आहेत. स्टीव्हनचा मॅनेजर क्रेग याने निवृत्तीच्या चर्चेा धुडकावून लावल्या. “स्टीव्हन आताही मला खूप काही मिळवायचंय असं म्हणतो”, असं क्रेगने माध्यमांशी संवाद साधघताना म्हटलं.
स्टीव्हनच्या कारकीर्दीतील सुवर्ण क्षण
स्टीव्हनची खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ही अफलातून राहिली आहे. मात्र स्टीव्हनची कारकीर्द ही अविस्मरणीय अशी आहे. स्टीव्हन हा ऑस्ट्रेलियाने 3 वेळा प्रतिष्ठेच्या असलेल्या एशेस सीरिज विजेता संघाचा सदस्य राहिला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने 2015 आणि 2013 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला. स्टीव्हन या टीममध्ये होता. तसेच टी 20 वर्ल्ड कप 2021 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेता ऑस्ट्रेलिया टीममध्येही स्टीव्हन होता.
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेचं आयोजन हे 14 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आलं आहे. पाकिस्तानने तिन्ही सामन्यांसाठी तर ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम | शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नोमान अली , सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर), सौद शकील आणि शाहीन शाह आफ्रिदी.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ,मार्नस लबुशेन, एलेक्स कैरी, कॅमरन ग्रीन, मिचेल मार्श, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, स्कॉट बोलँड आणि लान्स मॉरिस.