Team India | रोहितसेना जगात भारी, टीम इंडिया नंबर 1, ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मोठा फायदा
Indian Cricket Team | इंग्लंडला चौथ्या कसोटीत पराभूत करुन सीरिज लॉक केलेल्या टीम इंडियासाठी मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया नंबर 1 ठरली आहे.
वेलिंग्टन | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने न्यूझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात 172 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने आणि न्यूझीलंडच्या पराभवाने टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. टीम इंडिया जगात भारी ठरली आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत नंबर 1 ठरली आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाची मालिकेतील सुरुवात ही पराभवाने झाली. टीम इंडियाने त्यानंतर सलग 3 सामने जिंकत मालिकाही खिशात घातली. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाला आयसीसीकडून ही गोड बातमी मिळाली आहे. टीम इंडिया नंबर 1 ठरली आहे.
न्यूझीलंडला फटका टीम इंडियाला फायदा
ऑस्ट्रेलिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 59.09 इतकी आहे. तर टीम इंडिया 64.58 या विजयी टक्केवारीसह अव्वलस्थानी पोहचली आहे. तर न्यूझीलंडची 60 टक्क्यांसह पराभवामुळे दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
टीम इंडिया नंबर 1
The two-time ICC World Test Championship finalists ascend to the top of the standings 👀#WTC25 | Details 👇https://t.co/Zf63frP96w
— ICC (@ICC) March 3, 2024
टीम इंडियाची wtc 2023-2025 मधील कामगिरी
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने या 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभव झालाय. तसेच 1 सामना हा बरोबरीत सोडवण्यात यश आलं आहे. टीम इंडियाने ही कामगिरी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात केली आहे.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टीम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, स्कॉट कुग्गेलिजन, मॅट हेन्री आणि विल्यम ओरोर्के.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.