AUS vs AFG : ‘मॅक्सवेलच्या पायाला क्रॅम्प आला तेव्हा….’; पॅट कमिन्सकडून चालू सामन्यातील त्या गोष्टीबद्दल खुलासा!

AUS vs AFG : वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात कांगारूंनी विजय मिळवला. चालू सामन्यामध्ये मैदानात नेमकं काय घडत होतं याबाबत खुलासा केलाय.

AUS vs AFG : 'मॅक्सवेलच्या पायाला क्रॅम्प आला तेव्हा....'; पॅट कमिन्सकडून चालू सामन्यातील त्या गोष्टीबद्दल खुलासा!
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 10:47 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यामध्ये कांगारूंनी 3 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तान संघाच्या 292 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या मॅक्सवेल याने एकट्याने खिंड लढवत संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या 128 बॉलमध्ये नाबाद 201 धावा केल्या, यामध्ये त्याने 21 चौकार आणि 10 षटकार मारले. या विजयामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यानेही एक बाजू लावून धरत विकेट जावू दिली नाही. सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स मॅक्सवेलबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला पॅट कमिन्स?

हा विजय शब्दात व्यक्त करू शकत नाही, क्रिकेटमध्ये घडलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. ही ग्रेट इनिंग मी मैदानातून पाहिली. मॅक्सवेल शांत होता, त्याच्याकडे प्लॅन होता. 200 धावांचा पाठिंबा करत सामना जिंकणं खरंच विशेष होतं. मॅक्सवेलच्या पायाला क्रॅम्प येत होता त्यावेळी जम्पा मैदानात येण्यासाठी तयार होता मात्र मॅक्सी मैदानाच्या बाहेर गेला नाही. हे महत्त्वाचं होतं की तुम्ही कुठुनही सामन्यात कमबॅक करू शकता, आता आम्ही सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असून ही मोठी गोष्ट असल्याचं पॅट कमिन्स म्हणाला.

मॅक्सवेलला वरच्या फळीमधील कोणाची साथ मिळाली नाही त्यामुळे संघाची अवस्था वाईट झालेली. कमिन्सने 68 बॉलमध्ये 12 धावा केल्या पण त्या धावा मॅक्सवेलच्या द्विशतकाच्या बरोबरीच्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मॅक्सवेलला कोणीच साथ देत नव्हत, सर्व खेळाडू कागदी वाघ ठरले. अफगाणिस्तान संघाने विजय मिळवलाचा होता पण एक चूक त्यांना महागात पडली. ग्लेन मॅक्सवेलचा झेल त्यांनी सोडला अन् तिथूनच त्यांच्या परभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.