मुंबई | टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह अवघ्या काही दिवसांपूर्वीच बापमाणूस झाला. जसप्रीत बुमराह याची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन हीने मुलाल जन्म दिला. आपल्या मुलाच्या जन्मावेळी कुटुंबासोबत उपस्थित राहण्यासाठी बुमराह आशिया कपमधमून मायदेशी परतला. बुमराह त्यामुळे नेपाळ विरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यासाठी खेळू शकला नव्हता. बुमराहनंतर राजस्थान रॉयल्स टीमचा स्टार क्रिकेटर राहुल तेवतिया हा देखील बाप बनला. त्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरच्या घरी राजपुत्राचं आगमन झालं आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हीने मुलाला जन्म दिला आहे. विनी रमन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी आपल्या मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. तसेच या इंस्टाग्राम पोस्टमध्ये विनी रमन हीने आपल्या मुलाची जन्मतारीख आणि त्याचं नावही सर्वांसोबत शेअर केलं आहे. या फोटोत ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन या दोघांनी आपल्या मुलाचा हात हातात घेतला आहे.
ग्लेन मॅक्सवेल-विनी रमनचा राजपुत्र
Glenn Maxwell & his wife are blessed with a baby.
– The name is “Logan Maverick Maxwell”. pic.twitter.com/7ZkeLaPDEi
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
ग्लेन आणि विनी या दोघांनी आपल्या मुलाचं नाव लोगन मेवरिक असं ठेवलंय. लोगनचा जन्म 11 सप्टेंबरला झाल्याचं विनीने म्हटलंय. या गोड बातमीनंतर विनी आणि ग्लेन या दोघांचं सोशल मीडियावर भरभरुन अभिनंदन केलं जात आहे.
विनी रमन हीने मे 2023 मध्ये आपल्या घरी लवकरच दोघात तिसरा येणार असल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. तसेच जुलै महिन्यात विनीची डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम तामिळ पद्धतीने पार पडला होता.
ग्लेन मॅक्सवेल याची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशांची आहे. मात्र तिचा जन्म हा ऑस्ट्रेलियात झालाय. विनीचे आई-वडील काही वर्षांपूर्वी कामानिमित्ताने ऑस्ट्रेलियाला गेले आणि ते तिथलेच झाले. मात्र त्यांनी आपला भारतीय संस्कार सोडले नाहीत.
ग्लेन मॅक्सवेल मधल्या काळात ताणात होता. त्यामुळे त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.विनीने ग्लेनला या परिस्थितीतून बाहेर पडण्यात मदत केली होती. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर ग्लेनने विनीला एका उद्यानात प्रपोज केलं. तिथू पुढे रिलेशनला सुरुवात झाली. अनेक वर्ष रिलेशनमध्या राहिल्यानंतर दोघांनी 18 मार्च 2022 रोजी सप्तपदी घेतल्या.