टी20 वर्ल्डकपनंतर या ओपनरची निवृत्तीची घोषणा, स्पर्धेआधी निर्णयामुळे क्रीडाविश्वात खळबळ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कालावधीनंतर खेळाडू आपली निवृत्ती जाहीर करतात. पण इन फॉर्म असलेल्या फलंदाजाने राजीनामा जाहीर करताच चर्चांना उधाण येतं. असाच काहीसा धक्कादायक निर्णय तिसऱ्या सामन्यानंतर ओपनर खेळाडूने घेतल्याने चर्चा रंगली आहे.टी 20 वर्ल्डकपनंतर हा खेळाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू ठरावीक कालावधीनंतर निवृत्ती जाहीर करतात. काही खेळाडू मैदानाबाहेरूनच राजीनामा देऊन क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम लावतात. तर काही खेळाडू आधीच निवृत्ती जाहीर करून शेवटचा सामना खेळतात. आता असाच धक्का ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरने क्रीडापसिकांना दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळून वॉर्नरने कसोटी क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम दिला होता. त्यानंतर वनडेतून निवृत्ती जाहीर केली होती. आता वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळल्यानंतर डेविड वॉर्नरने निवृत्ती जाहीर केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा क्रिकेट कारकिर्दिचा शेवट असणार आहे, असं जाहीर केलं आहे. वॉर्नरने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली. यासाठी त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर डेविड वॉर्नरने आपलं मत व्यक्त केलं होतं. यात त्याने निवृत्तीची कल्पना देऊन टाकली.
“मुलांना खेळताना पाहून आनंद झाला. आयपीएलपूर्वी न्यूझीलंडसोबत पुढील मालिका आणि त्यानंतर टी20 विश्वचषकासाठी सज्ज होण्यासाठी मला भरपूर वेळ मिळाला आहे. आता माझ्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवणे आणि घरी असणं छान असेल. मला आश्चर्य वाटले की, सलामीचा गोलंदाज मला आऊट करण्याचा प्रयत्न करत नव्हता. कॅरिबियनमध्ये सीमा फार मोठ्या नाहीत. मी ठीक आहे आणि खरोखर चांगली बाब आहे. आमच्याकडे बरेच तरुण आणि आता पुढे जाण्याची त्यांची वेळ आहे.”, असं डेविड वॉर्नर बोलला होता. त्यामुळे घरच्या मैदानावरील डेविड वॉर्नरचा हा शेवटचा सामना होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौरा असणार आहे. मग आयपीएल आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे.
डेविड वॉर्नर 112 कसोटी सामने खेळला असून 8786 धावा केल्या आहेत. यात 335 ही सर्वोत्तम खेळी होती. 26 शतकं आणि 26 अर्धशतकं ठोकली आहेत. तर तीनवेळा 200हून अधिक धावा केल्या आहे. तर गोलंदाजी करत 4 गडी बाद केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 161 सामने खेळत 6932 धावा केल्या आहेत. यात 179 सर्वोत्तम खेळी आहे. यात 22 शतकं आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 क्रिकेटमध्ये 101 सामने खेळला असून 3 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.