Harmanpreet Kaur पराभवानंतर संतापली, म्हणाली, फक्त एक-दोन खेळाडूच….
T20 World Cup, IND vs AUS : टीम इंडियाला 152 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज असताना फक्त 4 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने यासह 9 धावांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली जाणून घ्या.
आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला अवघ्या 9 धावांनी पराभूत करत विजयी चौकार लगावला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करताना भारताला 9 विकेट्स गमावून 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. हरमनप्रीतने टीम इंडियासाठी सर्वाधिक आणि नाबाद 54 धावांचं योगदान दिलं. मात्र दुसऱ्या बाजूने अचूक साथ न मिळाल्याने भारताला पराभूत व्हावं लागलं. भारताच्या या पराभवानंतर हरमनने जाहीर नाराजी व्यक्त केली.
हरमनप्रीत काय म्हणाली?
“मला वाटतं की ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी विजयात योगदान दिलं. त्यांचे खेळाडू कुणा एकट्या दुकट्या खेळाडूंवर अवलंबून नाहीत. ऑस्ट्रेलियात अनेक अष्टपैलू आहे. आम्हीही चांगल्या प्रकारे योजना आखली होती. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी आम्हाला सहजासहजी धावा करु दिल्या नाहीत”, असं हरमनने स्पष्ट केलं.
“ऑस्ट्रेलिया अनुभवी संघ आहे. काही गोष्टी या तुमच्या हातात नसतात. राधा यादवने चांगली बॉलिंग केली. संघात असेल खेळाडू हवेत. हे आव्हान पूर्ण करता आलं असतं. मी आणि दीप्ती बॅटिंग करत होतो, तेव्हा आम्ही शक्य ते करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे”, असंही हरमनप्रीतने म्हटलं.
हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाबाबत काय म्हटलं?
💬 “We have to learn from them.”
A rueful Harmanpreet Kaur is full of praise for Australia’s talent-packed side.
Read the India captain’s post-match thoughts 📝⬇️#INDvAUS #T20WorldCup #WhateverItTakeshttps://t.co/IcIV9sw9ZV
— ICC (@ICC) October 13, 2024
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ताहिला मॅकग्रा (कॅप्टन), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.