रिकी पाँटिंग विराट कोहलीबाबत असं काय बोलून गेला, ज्याची सर्वत्र होतेय चर्चा, म्हणाला….
भारतीय संघावर टीका करणाऱ्या पाँटिंगने विराटसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे क्रीडा वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा चॅम्पियन कर्णधार रिकी पाँटिंग नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. पंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाँटिंगने भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीचा आताचा फॉर्म पाहिला तर पहिल्यासारखा विराट आता दिसत नाही. विराट संघातील प्रमुख खेळाडू असून त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आता चालू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेमध्येही अवघ्या 111 धावा त्याने केल्या आहेत. विराटचा हा फॉर्म पाहता त्याला टीकाकारांनी लक्ष्य केलं आहे. पाँटिंगने विराट कोहलीबाबत बोलताना त्याला सपोर्ट केला आहे. इतरवेळी भारतीय संघावर टीका करणाऱ्या पाँटिंगने विराटसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे क्रीडा वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विराट कोहलीबाबत बोलायचं झालं तर मी अनेकवेळा सांगितलं आहे की, चॅम्पियन खेळाडू नेहमीच त्याचा फॉर्म शोधत असतो. या क्षणी विराट खराब फॉर्ममध्ये आहे आपल्याला त्याच्याकडून धावांची अपेक्षा आहे. विराटला इतर कोणी सांगायची गरज नाही. कोहलीची काळजी घ्यायची गरज नाही तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल हे मला माहित असल्याचं रिकी पाँटिंग म्हणाला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये तेथील परिस्थिती उपखंडातील परिस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाँटिंगने सांगितले की, जर भारत जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्र ठरला तर त्याने आपल्या फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याचा विचार केला पाहिजे.
भारत जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्र ठरला तर त्यांनी आपल्या फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याबाबत विचार केला पाहिजे. रिकी पॉन्टिंग म्हणाला, ‘केएल राहुलसारखा खेळाडू संघाबाहेर आहे आणि शुभमन गिल खेळत आहे. दोघांनाही कसोटी खेळण्याचा अनुभव असून त्यांना एकाच संघात उतरवले जाऊ शकते.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.