Rishabh Pant | रिषभ पंत मॅचविनर खेळाडू, त्याला वनडे आणि टी 20 मध्ये संधी द्यायला हवी : ब्रॅड हॉज

पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

Rishabh Pant | रिषभ पंत मॅचविनर खेळाडू, त्याला वनडे आणि टी 20 मध्ये संधी द्यायला हवी : ब्रॅड हॉज
पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 7:08 PM

मुंबई : टीम इंडियाचा तडाखेदार फलंदाज रिषभ पंतच्या ( Team India Rishabh Pant) फटकेबाजीचा धसका ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूने घेतला आहे. “पंत विविध प्रकारचे फटके मारतो. इतर फलंदाजांच्या तुलनेत त्याची फटकेबाजीची शैली वेगळी आहे. त्यामुळे पंतविरोधात गोलंदाजी करणं फार अवघड आहे. तो मॅचविनर खेळाडू आहे. त्याला टी 20 आणि एकदिवसीय सामन्यातही संधी द्यायला हवी”, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने (Brad Hogg) निवड समितीला दिला आहे. हॉग त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होता. यावेळेस त्याने प्रतिक्रिया दिली. (australia former spinner brad hogg praised rishabh pant)

“पंतमध्ये आत्मविश्वास आहे. हे त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात मॅच विनिंग खेळी करुन सिद्ध केलं आहे. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या जागी तर टी 20 मध्ये संजू सॅमसनच्या जागी संधी द्यायला हवी”, असं हॉग म्हणाला. “तसेच गोलंदाजी आणि फलंदाजी अशी दुहेरी भूमिका बजावण्यासाठी संघात तुम्ही आणखी एका अष्टपैलू खेळाडूला संधी देऊ शकता”, असंही हॉगने स्पष्ट केलं.

पंतने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या सामन्यात विजयी खेळी केली. त्याने निर्णायक क्षणी गियर चेंज केला. कांगारुंवर जोरदार हल्ला चढवला. सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. अशा वेळेस पंत मैदानात घट्ट पाय रोवून उभा होता. त्याने एकूण 138 चेंडूत 9 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 89 धावा केल्या.

विराट कोहलची पाठराखण

गेल्या काही दिवसांपासून विराटऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. पण विराटच कर्णधार रहायला हवा, असं म्हणत हॉगने विराटची पाठराखण केली आहे. “विराट फार चांगला फलंदाज आहे. तो चांगली बॅटिंग करतो. विराटला कर्णधारपदावरुन हटवलं तर त्याचा टीम इंडियाच्या परंपरेवर आणि विराटवरही परिणाम होईल”, अशी भिती हॉगने व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतला होता. तेव्हा रहाणेने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. त्यामुळे विराटऐवजी रहाणेला कर्णधार करा, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

स्टम्पच्या मागे उभा राहून रिषभ पंत नेमकं काय गात होता; व्हिडीओ व्हायरल

Aus vs Ind 4th Test | व्हिलन होता होता रिषभ पंत हिरो ठरला, निर्णायक क्षणी गियर बदलला!

(australia former spinner brad hogg praised rishabh pant)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.