ODI WC 2023: वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीमची घोषणा, या दिग्गज खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी क्वॉलिफाय झालेले दहा संघ जोरदार तयारी करत आहेत. त्यासाठी आता संघांची घोषणा देखील होत असून काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात येत आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे सर्वांना वेध लागले आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. यासाठी दहा संघ कसून सराव करत आहेत. तर काही संघांना दिग्गज खेळाडूंना पसंती देखील दिली आहे. असं असताना वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. संघाचं नेतृत्व पॅट कमिंस याच्याकडे सोपण्यात आलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पॅट कमिंस याला दुखापत झाली आहे. असं असताना वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी तो सावरेल असा विश्वास निवड समितीला आहे. दुसरीकडे, 18 सदस्यीय प्राथमिक स्क्वॉडमध्ये अष्टपैलू एरॉन हार्डी आणि स्पिनर तनवीर संघा यांची निवड करण्यात आली आहे. पण या स्क्वॉडमधून मार्नस लाबुशेन याला डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोणत्या खेळाडूंची संघात निवड झाली?
कसोटी क्रिकेट संघात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबुशेन वर्ल्डकप संघात स्थान मिळवू शकला नाही. कसोटीत चांगल्या कामगिरीमुळे अव्वल स्थानावर आहे. सध्या ऑस्ट्रेलियाने 18 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यातून 15 खेळाडूंची अंतिम संघात निवड केली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला भारताविरुद्ध आहे.
आयसीसी नियमानुसार सर्व संघांना 28 सप्टेंबरपूर्वी आपल्या 15 खेळाडूंची नावं निश्चित करावी लागणार आहे. “कमिंसच्या डाव्या मनगटाला फ्रॅक्चर आहे. त्यामुळे सहा आठवडे रिहॅबमध्ये असेल. स्पर्धेपूर्वी आराम केल्यास कमिंसला फायदा होईल.”, असं निवड समिती अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलिया पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसह वर्ल्डकपची तयारी करेल. या सामन्यात तनवीर आणि हार्डी यांना संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. 1987, 1999, 2023, 2007 आणि 2015 चा वनडे वर्ल्डकप आपल्या नावावर केला आहे.
Presenting your 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India! ??? pic.twitter.com/h6jVWYJvMy
— Cricket Australia (@CricketAus) August 7, 2023
ऑस्ट्रेलियाची 18 सदस्यीय वर्ल्ड कप टीम: पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, स्टीव स्मिथ , मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.