AUS vs WI : टी20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाची रंगीत तालिम! या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत स्थान
वेस्ट इंडिजचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन सामन्यांच्या कसोटी आणि वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली आहे. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं दिसत आहे.
मुंबई : ऑस्ट्रलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व मिचेल मार्शकडे सोपवण्यात आलं आहे. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आतापासूनच संघाची बांधणी सुरु केल्याचं दिसत आहे. कारण या संघात डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड यांना संधी देण्यात आली आहे. वनडे वर्ल्डकपनंतर भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी मॅथ्यू वेडकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. कारण वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या खेळाडूंना आराम दिला गेला होता. आता पुन्हा एकदा मिचेल मार्शकडे नेतृत्व सोपवण्यात आलं असलं तरी कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही. टी20 वर्ल्डकपसाठी पॅट कमिन्सच्या नावाचाही पर्याय आहे.
टी20 संघातून स्टीव्ह स्मिथला डावलण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी निवड समितीने मॅथ्यू शॉर्टवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे पुढची मालिका आणि टी20 वर्ल्डकपमधून त्याला डावललं तर आश्चर्य वाटायला नको. वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर थेट टी20 वर्ल्डकपमध्ये 6 जूनला ओमानविरुद्ध खेळणार आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मजबूत स्थितीत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे 2025 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघ दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
ऑस्ट्रेलियाचा टी20 संघ : मिशेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, जेसन बेहरेनडोर्फ, टिम डेविड, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर, एडम झाम्पा.
वेस्ट इंडिजचा टी20 संघ : रोवमॅन पॉवेल (कर्णधार), शाय होप, जॉनसन चार्ल्स, रस्टन चेज, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, ओशेन थॉमस.