AUS vs IND, 2nd Test | रहाणेचं झुंजार शतक, स्टीव्ह स्मिथकडून रिसपेक्ट ! वाचा काय घडलं?

कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरोधात झुंजार 112 धावांची शतकी खेळी केली.

AUS vs IND, 2nd Test | रहाणेचं झुंजार शतक, स्टीव्ह स्मिथकडून रिसपेक्ट ! वाचा काय घडलं?
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 11:11 AM

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (AUS vs IND, 2nd Test) यांच्यात मेलबर्नमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात शानदार 326 धावा करत 131 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली. ही आघाडी मिळवण्यात कर्णधार अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) महत्वाचं योगदान राहिलं. अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार शतक ठोकत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या शतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूने रहाणेचे कोतुक केलं. (australia steve smith smith congratulate to ajinkya rahane for his century )

या शतकी खेळीनंतर स्टीव्ह स्मिथने रहाणेचं अभिनंदन केलं.  साधारणपणे  ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी सामन्यात स्लेजिंग केली जाते. मात्र स्टीव्हने रहाणेचं अभिनंदन करत खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

अजिंक्य मेलबर्नवर दुसऱ्यांदा शतक लगावणारा दुसराच भारतीय ठरला आहे. याआधी विनू मांकड यांनी ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे ही दोन्ही शतकं अजिंक्यने बॉक्सिंग डे कसोटीत लगावली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अजिंक्यने 2014 मध्ये मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरोधात शतकी खेळी केली होती.

तसेच रहाणेने हनुमा विहारी आणि रिषभ पंतसह चांगली भागीदारी केली. तर यानंतर रवींद्र जाडेजासह 121 धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदाऱ्यांमध्ये रहाणेने महत्वाची भूमिका बजावली. तसेच कर्णधारपदाच्या भूमिकेला न्याय दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. त्यानंतर रहाणे दुर्देवीरित्या आऊट झाला. रहाणेने 223 चेंडूत 12 चौकारासंह 112 धावांची शतकी खेळी केली.

“कर्णधाराला पाहून शिकतोय”

शुभमन गिलने आयपीएलमध्ये चमकदार कामिगिरी केली. या जोरावर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं. तसेच त्याला दुसऱ्या कसोटीत पदार्पणही केलं. या पदार्पणातील सामन्यातील पहिल्या डावात गिलने 65 चेंडूत 8 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. “कांगारुंच्या आक्रमक आणि भेदक माऱ्याला कसे उत्तर द्यावे, हे मी कर्णधार रहाणेकडून शिकतोय”, असं गिल म्हणाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये गिलने हे वक्तव्य केलं.

संबंधित बातम्या :

PHOTO | जबरदस्त जाडेजा ! कसोटी क्रिकेटमध्ये बॅटिंगच्या बाबतीत दिग्गज फलंदाजांना देतोय टक्कर

AUS vs IND, 2nd Test 3rd Day Live : ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, स्टीव्ह स्मिथ माघारी

(australia steve smith smith congratulate to ajinkya rahane for his century )

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.