AUS vs PAK TEST : पॅट कमिन्सनं पाकिस्तानला ढकललं पराभवाच्या खड्ड्यात! दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसली. त्यामुळे आता पाकिस्तान मालिका गमवण्याची वेळ येऊ शकते. कारण पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साखळीतील कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. कारण या मालिकेत हार जीत विजयी टक्केवारी निश्चित करणार आहे. त्यामुळे संघाचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्नही भंगू शकतं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तनने ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. मार्नस लाबुशेन वगळता मोठी खेळी करणं कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही. लाबुशेननं 63 धावांची खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने 42 आणि मिचेल मार्शने 41 धावांची खेळी केली. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 318 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव गडगडला. दुसऱ्या दिवशी निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळू शकते असा अंदाज आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 300 च्या पार धावा विजयासाठी दिल्या तर पाकिस्तानला त्या करणं कठीण जाईल.
पाकिस्तानला इमाम उल हकच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि शान मसूद या जोडीने चांगली भागीदारी केली. अब्दुल्ला शफिकने 62, तर शान मसूदने 54 धावांची खेळी केली. या जोडीने 90 धावांची भागीदारी केली. पण अब्दुल्ला शफीक बाद झाला आणि डाव गडगडला. बाबर आझमही काही खास करू शकला नाही. अवघी एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर शान मसूद 54 धावा करून तंबूत परतला, सउद शकील 9, आघा सलामान 5 धावा करून बाद झाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मोहम्मद रिझवान नाबाद 29 आणि आमेर जमाल नाबाद 2 धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर नाथन लायनने 2 आणि जोश हेझलवूडने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 124 धावांची आघाडी आहे. त्यामुळे ही आघाडी मोडण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानच्या 4 फलंदाजांवर आहे. जर शक्य झालं नाही तर ऑस्ट्रेलियाचा विजयी मार्ग सोपा होईल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड