ENG vs AUS : Travis Head चं विस्फोटक अर्धशतक, सॅम करनला झोडला

| Updated on: Sep 12, 2024 | 12:38 AM

Travis Head Fifty Eng vs Aus 1st T20 : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेडने स्कॉटलँडनंतर आता इंग्लंड विरुद्ध झंझावाती खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे.

ENG vs AUS : Travis Head चं विस्फोटक अर्धशतक, सॅम करनला झोडला
Travis Head Fifty Eng vs Aus 1st T20
Image Credit source: Icc X account
Follow us on

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेडने स्कॉटलँडनंतर इंग्लंड विरुद्धही विस्फोटक बॅटिंग करणं सुरु ठेवलं आहे. हेडने इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेची त्याच्या खास शैलीने सुरुवात केली आहे. हेडने पहिल्या सामन्यात विस्फोटक अर्धशतक ठोकलं आहे. हेडने द रोज बॉल, साउथम्पटन येथे खेळवण्यात येत असलेल्या सलामीच्या सामन्यात तोडफोड खेळी केली. हेडने या अर्धशतकादरम्यान चौफेर फटकेबाजी केली हेडने इंग्लंडचा गोलंदाज सॅम करन याला झोडून काढला. हेडने सॅमच्या एका ओव्हरमध्ये 30 धावा चोपल्या. हेडने केलेल्या या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 86 धावांपर्यंत मजल मारता आली.

इंग्लंडचा साकिब महमूद ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहावी ओव्हर टाकत होता. हेडने सहाव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सिक्स ठोकला. त्यामुळे हेडने अवघ्या 19 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हेडच्या या अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. हेडच्या टी 20i कारकीर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं. हेडने या दरम्यान सामन्यातील पाचव्या ओव्हरमध्ये 30 धावा केल्या. हेडने सॅम करन याला झोडून काढला. हेडने पाचव्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 3 सिक्स आणि 3 फोर लगावले. हेडला या 30 धावांमुळे 19 चेंडूत अर्धशतक करता आलं. मात्र हेड अर्धशतक केल्यानंतर 4 बॉलवर आऊट झाला. हेडने 23 बॉलमध्ये 256.52 च्या स्ट्राईक रेटने 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

हेडने सॅम करनला झोडला, एका ओव्हरमध्ये 30 धावा

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कॅप्टन), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट (कॅप्टन आणि विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद आणि रीस टोपले.