Australia vs India, 1st Test | ‘उडता’ विराट, कोहलीचा सुपरमॅन कॅच पाहिलात का?
कॅमरॉन ग्रीनने आपल्या पदार्पणातील सामन्यात 24 चेंडूत 11 धावा केल्या.
अॅडिलेड : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात पहिला कसोटी सामना (Australia vs India 1st Test) खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 233 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरीत करत कांगारुंना झटके दिले. एका बाजूला गोलंदाज चांगली कामगिरी करतायेत. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी मानर्स लाबूशानेचा तब्बल 3 वेळा कॅच सोडला. मात्र टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नेहमी प्रमाणे आपल्या हटके स्टाईलने हवेत झेप घेत अफलातून कॅच घेतला. विराटने कसोटी पदार्पण केलेल्या कॅमरॉन ग्रीनचा अफलातून कॅच घेत माघारी पाठवलं. यासह ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका बसला. Australia vs India 1st Test Virat Kohli caught Cameron Green in the air
Cameron Green's debut innings was stopped short by an absolute classic from Virat Kohli – and the Indian captain enjoyed it a lot! #OhWhatAFeeling@toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/krXXaZI1at
— cricket.com.au (@cricketcomau) December 18, 2020
रवीचंद्रन आश्विन सामन्याची 41 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फटका मारला. शॉर्ट मिड विकेटला विराट होता. आपल्या दिशेने येत असलेला चेंडू विराटने पाहिला. विराटला चेंडूपासून दूर असल्याचं जाणवलं. विराटने वेळ न दवडता हवेत झेप घेतली. यासह विराटने अफलातून कॅच घेतला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने आपली पाचवी विकेट गमावली. ग्रीनला आपल्या पदार्पणातील सामन्यात 24 चेंडूत 11 धावाच करता आल्या.
आश्विनची फिरकी, कांगारुंना गिरकी
आश्विनने ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 3 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड आणि कॅमरॉन ग्रीन यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
Virat Kohli | अर्धशतकांचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा, कोहलीची ‘विराट’ खेळी
Australia vs India, 1st Test, Day 2 : ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, ट्रॅव्हिस हेड आऊट
Australia vs India, 1st Test, Day 2 : लाबुशेनला दोनदा जीवदान, बुमराह-साहाची घोडचूक महागात?
Australia vs India 1st Test Virat Kohli caught Cameron Green in the air