Australia vs India, 3rd Test, 3rd Day Highlights : ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची आघाडी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ (Aus vs Ind 3rd Test) संपला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसावर कांगारुंनी वर्चस्व मिळवलं आहे. कांगारुंनी तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन 47 तर स्टीव्ह स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. (australia vs india 2020 21 3rd test day 3 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground) लाईव्ह स्कोअरकार्ड
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी आक्रमक गोलंदाजीने टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोव्हसकी ही सलामी जोडी मैदानात आली. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. सिराजने पुकोव्हसकीला 10 धावावंर कॅच आऊट केलं. यानंतर मार्नस लाबुशेन आणि डेव्हिड वॉर्नरने धावफळक हलता ठेवला. मात्र यानंतर अश्विनने वॉर्नरला एलबीडल्यू बाद केलं. वॉर्नरने 13 धावा केल्या.
वॉर्नर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 35-2 अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी तिसऱ्या दिवसखेर 68 धावांची नाबाद भागीदारी केली. खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47 तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलियाकडे तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा पहिला डाव
टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 244 धावा केल्या. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने 50 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतनेही 36 धावांची झुंजार खेळी केली. रवींद्र जाडेजाला दुखापतीमुळे 28 धावांवर दुखापत झाली. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर जोश हेझलवूडने 2 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल स्टार्कने 1 खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला. तर टीम इंडियाचे 3 फलंदाज रन आऊट झाले.
LIVE NEWS & UPDATES
LIVE NEWS & UPDATES
-
भंडाऱ्याच्या घटनेतून बरेच काही शिकण्याजोगे : जयंत पाटील
सांगली :- भंडाऱ्यात आज घड़लेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. 7 बालकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेतून काळजी घेण्यासारखे बरेच काही शिकण्याजोगे आहे. जेथे आपण बरेच जण एकत्र जमतो अशा जागा , रुग्णालये असो, अशा ठिकाणी खबरदारी घेण्याची आवश्यकता असते – जयंत पाटील, जलसंपदा मंत्री
-
सर्व रुग्णालयांच्या यंत्रणा योग्य ठेवा, भंडारा दुर्घटनेनंतर मुंबई महापौरांचे आदेश
दिल्लीत रुग्णालयात दुर्घटना घटना घडली तेव्हाच मुंबईतील सर्व रुग्णालयाचे ऑडिटचे करण्याचे आदेश दिले होते. भंडारा येथील घटना दुर्दैवी आहे. मुंबईतील सर्व रुग्णालय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे , फायर विभागाने सुद्धा मुंबईत अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्व रुग्णालयाची यंत्रणा योग्य ठेवा असे आदेश दिल्याची माहिती , मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
-
-
तिसऱ्या दिवसावर कांगारुंचं वर्चस्व
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ (Aus vs Ind 3rd Test) संपला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसावर कांगारुंनी वर्चस्व मिळवलं आहे. कांगारुंनी तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारुंची 2 बाद 103 अशी धावसंख्या होती. मार्नस लाबुशेन 47 तर स्टीव्ह स्मिथ 29 धावांवर नाबाद आहेत.
-
लाबुशेन-स्मिथ जोडीची तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाकडे ताज्या आकडेवारीनुसार 196 धावांची आघाडी आहे.
-
मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला
ऑस्ट्रेलियाने पहिले 2 विकेट्स लवकर गमावले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डावा सावरला आहे.
-
-
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
ऑस्ट्रेलियाने दुसरी विकेट गमावली आहे. डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. रवीचंद्रन अश्विनने वॉर्नरला 13 धावावंर एलबीडलब्यू आऊट केलं आहे.
-
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातील पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर विल पुकोवस्कीला मोहम्मद सिराजला विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या हाती कॅच आऊट केलं आहे. पुकोवस्कीने 10 धावा केल्या.
-
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील फंलदाजीला सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील फंलदाजीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि विल विल पुकोवस्की ही सलामी जोडी मैदानात आली आहे. कांगारुंनी भारताला पहिल्या डावात 244 धावांवर ऑल आऊट केलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या होत्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली आहे.
-
244 धावांवर भारताचा डाव आटोपला, मोहम्मद सिराज 6 धावांवर बाद
244 धावांवर भारताचा डाव आटोपला आहे. मोहम्मद सिराज 6 धावांवर भारताच्या दहाव्या फलंदाजाच्या रुपात बाद झाला. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा 28 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी मिळाली आहे.
-
भारताचा आठवा फलंदाज माघारी, नवदीप सैनी 3 धावांवर बाद
भारताचा आठवा फलंदाज माघारी परतला आहे. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेडने अप्रतिम झेल घेत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीला बाद केले. त्याने 3 धावा केल्या.
-
206 धावांवर भारताचा सातवा गडी माघारी, रवीचंद्रन अश्विन 10 धावांवर बाद
आक्रमक सुरुवात करणारा रवीचंद्रन अश्विन बाद झाला आहे. त्याने दोन चौकारांसह 10 धावांवर जमवल्या. पॅट कमिंसने त्याला धावाबाद केले.
-
195 धावांवर भारताचा सहावा गडी माघारी, चेतेश्वर पुजारा 50 धावांवर बाद
भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा 50 धावांवर बाद झाला आहे. पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टीम पेनने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
-
भारताचा पाचवा गडी परतला, ऋषभ पंत 35 धावांवर बाद
आक्रमक फलंदाज ऋषभ पंत 35 धावांवर बाद झाला आहे. जोश हेडलवूडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये डेव्हिड वॉर्नरने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
-
चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक पूर्ण
भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. पुजाराने 174 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 50 धावा पूर्ण केल्या आहेत.
-
पंत-पुजारामध्ये 50 धावांची भागिदारी
सकाळच्या सत्रात कप्तान रहाणे आणि हनुमा विहारीची विकेट गमावल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतने भारताचा डाव सावरला आहे. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी रचली आहे. पुजारा 49 तर पंत 35 धावांवर खेळत आहेत.
-
नव्या चेंडूसह ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून बाऊन्सर्सचा मारा
नव्या चेंडूसह ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांविरुद्ध बाऊन्सर्सचा मारा सुरु केला आहे. त्यातही प्रामुख्याने सुरुवातीपासून आक्रमक फटके खेळणाऱ्या ऋषभ पंतविरोधात तगडी रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे पंतचं आक्रमण काही प्रमाणात थोपवण्यात कांगारुंना यश मिळालं आहे.
-
नव्या चेंडूसह ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांकडून आक्रमण
80 षटकांचा खेळ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या हाती नवा चेंडू सोपवण्यात आला आहे. या नव्या चेंडूसह ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले आहेत. पुजारा आणि पंतची जोडी मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिंस या ऑस्ट्रेलियन तोफखान्याचा सामना कसा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
-
लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाचे चार फलंदाज माघारी, पंत आणि पुजारावर भारताची मदार
चार प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताची पूर्ण मदार आता चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत या दोघांच्या खांद्यावर आहे. पुजारा सावधपणे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करतोय तर पंतने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली आहे. पुजारा 42 तर पंत 29 धावांवर खेळत आहेत. भारताने आतापर्यंत 79 षटकांमध्ये 4 गड्यांच्या बदल्यात 180 धावा फलकावर लावल्या आहेत. टीम इंडिया अद्याप 158 धावांनी पिछाडीवर आहे.
-
भारताची मदार पंत आणि चेतेश्वर पुजारावर
आघाडीचे चार फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताची पूर्ण मदार आता चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या दोघांच्या खांद्यावर आहे. पुजारा सावधपणे कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करतोय तर पंतने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली आहे. पुजारा 41 तर पंत 26 धावांवर खेळत आहेत.
-
हनुमा विहारी रनआऊट, ऋषभ पंतकडून आक्रमक सुरुवात (भारत 160/4)
हनुमा विहारी (04) धावबाद (रनआऊट) झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत चेतेश्वर पुजाराच्या साथीला मैदानात उतरला आहे. पंतने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली आहे. पुजारा सध्या 40 तर पंत 13 धावांवर खेळत आहेत.
-
पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर कर्णधार रहाणे बाद
काल सावध खेळ करणाऱ्या कर्णधार रहाणेने आज आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु पॅट कमिंसने रहाणेला त्रिफळाचित केले. रहाणेने एक चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 22 धावा केल्या
Published On - Jan 09,2021 2:31 PM