AUS vs IND : टीम इंडियाचा अ‍ॅडलेडमध्ये ’36’ चा आकडा, रोहितसेना ऑस्ट्रेलियाचा वचपा घेण्यासाठी सज्ज, दुसरा सामना केव्हा?

Australia vs India 2nd Test Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा अ‍ॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. टीम इंडियाचा अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये '36' चा आकडा आहे.

AUS vs IND : टीम इंडियाचा अ‍ॅडलेडमध्ये '36' चा आकडा, रोहितसेना ऑस्ट्रेलियाचा वचपा घेण्यासाठी सज्ज, दुसरा सामना केव्हा?
Australia vs India Test
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 6:24 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दुसरा सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा अनुपस्थितीनंतर दुसऱ्या सामन्यात नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासह 2020 चा वचपा घेण्याची दुहेरी संधी असणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला अ‍ॅडलेडमध्ये 36 धावांवर ऑलआऊट केलं होतं. त्यामुळे भारताचा अ‍ॅडलेडमध्ये 36 चा आकडा आहे. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला याच मैदानात पराभूत करत वचपा घेणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा दिवस-रात्र सामना असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 9 वाजता टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी मोबाईलवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.