Sydney Test | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, स्टेडियममध्ये मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात प्रेक्षकांच्या सुरक्षेखातर हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

Sydney Test | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, स्टेडियममध्ये मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 7 जानेवारीपासून सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 11:53 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs india) यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील (Border Gavskar Trophy) 2 कसोटी खेळण्यात आल्या. या 2 कसोटींपैकी दोन्ही संघांनी 1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Test) खेळण्यात येणार आहे. या सामन्यात प्रेक्षक संख्यांवर मर्यादा घालण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा आज (4 जानेवारी) निर्णय घेतला आहे. (australia vs india 3rd sydney test match only 25 percent crowd allowed said australia cricket board)

या नव्या निर्णयानुसार स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या 25 टक्के चाहत्यांना उपस्थित राहता येणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडची एकूण क्षमता ही 38 हजार इतकी आहे. यामुळे 25 टक्के यानुसार तिसऱ्या सामन्यासाठी जवळपास 9 हजार 500 क्रिकेट चाहत्यांनाच हा सामना स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहता येणार आहे. या निर्णयामुळे पुन्हा तिकीट विक्री होणार आहे. तसेच ज्यांनी आधीच या सामन्याचे तिकीट घेतले आहेत, त्यांना त्याचे पैसे परत केले जातील, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली.

सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य

दोन्ही संघातील खेळाडूंना, त्यांच्या इतर सहकाऱ्यांना, ग्राऊंड स्टाफ तसेच क्रिकेट चाहत्यांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी दिली.

हा तिसरा सामना सिडनीतच खेळण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया बोर्डाने दिली. गेल्या काही आठवड्यांपासून सिडनीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवे रुग्ण सापडले होते. यामुळे खेळाडूंना तसेच क्रिकेट चाहत्यांना धोका होऊ नये, म्हणून हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र ऑस्ट्रेलिया बोर्डाने स्थानिक सरकारच्या मदतीने सिडनीतच या सामन्याचं आयोजन केलं.

सिडनीसाठी दोन्ही संघ रवाना

सिडनीतील तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ मेलबर्नवरुन सिडनी ला रवाना झाल्या आहेत. येथे पोहचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने यामध्ये दोन्ही संघांच्या सर्व सदस्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला.

तिसरा सामना निर्णायक

मालिकेच्या दृष्टीने तिसरी कसोटी निर्णायक असणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. तसेच टीम इंडियामध्ये हिटमॅन रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. यामुळे टीम इंडियाची बाजू मजबूत झाली आहे. यामुळे टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

सिडनीत टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरोधातील आकडेवारी फारशी चांगली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.

संबंधित बातम्या :

Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज

भारतीय संघाच्या ‘या’ सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?

(australia vs india 3rd sydney test match only 25 percent crowd allowed said australia cricket board)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.