अरे काय तू पण…फक्त 2 रनमध्येच विराट आऊट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहालीत होतोय. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी दिलीय. यात विराट कोहलीनं चाहत्यांची घोर निराशा केली आहे.
नवी दिल्ली : आधी आयपीएलमध्ये (IPL 2022) निराश केली, त्यानंतर आशिया चषकात (Asia Cup) चांगलं खेळला, आता पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोर निराशा विराट कोहलीनं केली आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील (India vs Australia 1st t20) पहिला सामना मोहालीत सुरु आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी दिलीय. यात विराट कोहली हा फक्त दोन धावा काढून माघारी परतला आहे. पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूत नाथन एलिकच्या चेंडूवर विराट आऊट झालाय. यावेळी कोहलीची विकेट कॅमरुन ग्रीननं घेतली. विराट कोहलीनं घोर निराशा केल्याचं चाहते म्हणताना दिसतायत.
आयसीसी ट्विट
India lose Rohit Sharma and Virat Kohli in the Powerplay ?#INDvAUS | ? Scorecard: https://t.co/Afs4NOJP1W pic.twitter.com/g9RuSFhYpM
— ICC (@ICC) September 20, 2022
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असणार याविषयी उत्सुकता लागून होती. यात देखील अनेकांची निराशा झाल्याचं दिसतंय.
विराट कोहली पुन्हा निशाण्यावर
आयपीएलमधील कामगिरीनंतर विराट कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. पुन्हा एकदा तसं होताना दिसत आहे. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स देखील व्हायरल होत आहे. तर पुन्हा विराटनं निराशा केल्याचं बोललं जातंय.
ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध 3 सामने
टी-20 विश्वचषकापूर्वी हा सामना महत्वाचा मानला जातोय. दोन्ही संघानं आपली तयारी मजबूत केली आहे. भारतीय संघाला T20 विश्वचषकापूर्वी फक्त 6 सामने खेळायचे आहेत, तर ऑस्ट्रेलियाचेही तेवढेच सामने आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध तीन सामने आणि इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायदेशात तीन सामने खेळणार आहे.