आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेला अ‍ॅरॉन फिंच कडाडला, 4 षटकारांसह ठोकल्या 79 धावा

फिंचने (aaron finch) न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 मध्ये (australia vs new zealand 4 th 20) एकूण 55 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह ही खेळी केली.

आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेला अ‍ॅरॉन फिंच कडाडला, 4 षटकारांसह ठोकल्या 79 धावा
फिंचने (aaron finch) न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 मध्ये (australia vs new zealand 4 th 20) एकूण 55 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह ही खेळी केली.
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 8:02 AM

वेलिंग्टन : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा (Indian Premier League) लिलाव नुकताच पार पडला. यामध्ये काही युवा खेळाडूंचे नशिब फळफळलं. काही खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईज पेक्षा अनपेक्षितपणे अधिक रक्कम मिळाली. तर काही अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू हे अनसोल्ड राहिले. त्यापैकीच एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा टी 20 कर्णधार असलेला (Australian Captain Aaron Finch) अ‍ॅरॉन फिंच. फिंचला आपल्या ताफ्यात घेण्यास कोणत्याही फ्रँचायजीने रस दाखवला नाही. पण फिंचने आपल्या बॅटने धमाकेदार खेळी करत या फ्रँचायजींना रोखठोक उत्तर दिलं आहे. फिंचने न्यूझीलंड विरुद्धच्या 4 थ्या टी 20 सामन्यात 79 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाचा विजयात निर्णायक भूमिका बजावली. (australia vs new zealand 4 th 20 aaron finch scored 79 runs with 4 sixes)

ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाने या चौथ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फिंचने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 79 धावा चोपल्या. फिंचने एकूण 55 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह ही खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंजदाजांनी पाहुण्या न्यूझीलंडला 18.5 ओव्हर्समध्ये 106 धावांवर गुंडाळले. यासह ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी विजय झाला. न्यूझीलंडकडून कायले जेमिन्सने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर टीम सायफर्टने 19 धावांची खेळी केली. तसेच डेवोन कॉनवेने 17 रन्स केल्या. या व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅडम झॅम्पा आणि एश्टन एगरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

फिंचची आयपीएलच्या 13 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी

फिंचला आयपीएलच्या 13 व्या हंगामात आपल्या लौकीकाला साजेशी करता आली नव्हती. फिंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता. फिंचने या मोसमातील एकूण 12 सामने खेळले होते. त्याने यामध्ये 22.33 च्या सरासरीने आणि 111.20 स्ट्राईक रेटने 268 धावा केल्या. यामध्ये केवळ 1 अर्धशतकाचा समावेश होता. त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे फिंचला रिलीज करण्यात आलं. त्याच्या या कामगिरीचा फटका त्याला लिलावात बसला. त्यामुळे तो आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी अनसोल्ड राहिला. मात्र फिंचने त्याच्या कर्तृत्वावर शंका घेणाऱ्या फ्रँचायजींना ताबडतोड 79 धावा करत चोख प्रत्युतर दिलं आहे.

संबंधित बातम्या :

Video | जेम्स अँडरसनच्या बोलिंगवर रिषभ पंतने मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का?

(australia vs new zealand 4 th 20 aaron finch scored 79 runs with 4 sixes)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.