AUS vs PAK 3rd T20I : पाकिस्तानसमोर क्लिन स्वीप रोखण्याचं आव्हान, ऑस्ट्रेलिया विजयी हॅटट्रिक करणार?

Australia vs Pakistan 3rd T20I : ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी तिसरा आणि अंतिम सामना हा प्रतिष्ठेचा असणार आहे.

AUS vs PAK 3rd T20I : पाकिस्तानसमोर क्लिन स्वीप रोखण्याचं आव्हान, ऑस्ट्रेलिया विजयी हॅटट्रिक करणार?
aus vs pak harris raufImage Credit source: Pakistan Cricket X Account
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 1:17 AM

पाकिस्तान क्रिकेट टीम मोहम्मद रिझवान यान नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने रिझवानच्या कॅप्टन्सीत अप्रतिम सरुवात केली. पाकिस्तानने कांगारुंवर 22 वर्षांनंतर त्यांच्याच घरात एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली. मात्र त्यानंतर टी 20I मालिकेत त्यांची दुर्दशा झाली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या टी 20I सीरिजमध्ये सलग 2 सामने जिंकत मालिकेवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजयी हॅटट्रिकसह पाकिस्तानला क्लिन स्वीप करण्याची दुहेरी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसमोर शेवटचा सामना जिंकून क्लिन स्वीप टाळण्याचं आव्हान असणार आहे. आता तिसऱ्या सामन्यात कांगारु विजयी हॅटट्रिक करतं की पाकिस्तान तसं करण्यापासून रोखतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना सोमवारी 18 नोव्हेंबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना होबार्ट येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.

ऑस्ट्रेलिया टीम : मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, ॲडम झाम्पा, जोश फिलिप आणि शॉन ॲबॉट.

पाकिस्तान टीम: मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, साहिबजादा फरहान, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, सुफियान मुकीम, हारिस रौफ, हसीबुल्ला खान, अराफत मिन्हास, जहाँदाद खान आणि ओमेर युसूफ.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.